Vidhan Sabha Election 2024 : मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? काँग्रेस 105 जागा, तर...
Maharashtra Vidhan Sabha election 2024 : महाविकास आघाडीकडून आधी जागावाटप निश्चित करण्यावर जोर दिला जात असून, लवकरच याबद्दल अधिकृतपणे भूमिका मांडली जाऊ शकते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?
काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता
Maha Vikas Aghadi Vidhan Sabha elections 2024 : महाविकास आघाडी करून एकत्र निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षांनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी आता महाविकास आघाडीने जागावाटपाचा गुंता सोडवण्याला प्राधान्य दिले आहे. दरम्यान, मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे वृत्त लोकमतने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. (Latest Update About Maha Vikas Aghadi Seat Sharing formula for Maharashtra Assembly Election 2024)
ADVERTISEMENT
शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत या महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या पक्षांच्या नेत्यांची बैठक शनिवारी पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी एकजुटीने विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
शनिवारी झालेल्या मविआच्या पत्रकार परिषदेपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाच्य फॉर्म्युल्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हे वाचलं का?
महाविकास आघाडी कोणत्या निकषांवर जागावाटप?
सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत अशी चर्चा झाली की, सर्व पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त इतर कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे, याची चाचपणी मविआतील प्रत्येक पक्ष करणार आहे.
हेही वाचा >> "वायकरांच्या निकालात वंदना सूर्यवंशींचा मोठा हात"
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही मतदारसंघ, मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसची ताकद आहे. तिथे काँग्रेसला जास्त जागा दिल्या जातील. कोकण, मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> वायकरांचा विजय वादात, शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांमध्ये ताकद आहे. जिथे त्यांची ताकद आहे, त्या जागा राष्ट्रवादीला दिल्या जाण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभेच्या जागावाटपात जास्त जागा दिल्या जाऊ शकतात. काँग्रेसला 100-105 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >> निवडणूक आयोग निकाल बदलू शकतो- माजी निवडणूक अधिकारी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 90 ते 95 जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीतील एका नेत्याच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात सांगलीमध्ये जी चूक झाली, ती यावेळी टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिंकून येण्याचा निकष ठेवून जागावाटपाचा प्रयत्न केला जाणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT