Maharashtra Assembly Election : बंडखोर, उमेदवारांची संख्या ते पक्षांची संख्या... निवडणुकीला ऐतिहासिक बनवणारे 5 कारणं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात उमेदवारांची संख्या किती पटीने वाढली?

point

कोणत्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात?

point

विधानसभा निवडणूक का आहे ऐतिहासिक?

Maharashtra Vidhan Sabha Elections : महाराष्ट्र आज विधानसभेची निवडणुकीचं मतदान पार पडतं आहे. राज्यात पाच वर्षात घडून गेलेल्या मोठ्या घडामोडींनंतर होणारी ही निवडणूक वेगवेगळ्या कारणांमुळे महत्वाची असणार आहे. सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीसमोर सत्ता काय ठेवण्याचं आव्हान आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला सत्तेत येण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे. राज्यतील सर्व 288 विधानसभा जागांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं असून, संध्याकाळी 6 वाजता मतदान संपणार आहे.

ADVERTISEMENT

 

1. कोणत्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT


राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये असलेल्या भाजपने 149 जागांवर, शिंदेंच्या शिवसेने 81 जागांवर, अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने 59 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसने 101, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 95, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 86 उमेदवार उभे केले आहेत.

ADVERTISEMENT


2. अपक्ष आणि लहान पक्षांचाही बोलबाला

ADVERTISEMENT

यंदाची निवडणुकीत राज्यात बहुजन समाज पक्ष, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम), परिवर्तन महाशक्ति, वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी यासह अनेक छोटे पक्ष मैदानात आहेत. बसपाने 237 तर एआयएमआयएमने 17 उमेदवार उभे केले आहेत.

3. उमेदवारांची संख्या वाढली

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी उमेदवारांची संख्या 28 टक्क्यांनी वाढली आहे. 2019 मध्ये 3,239 उमेदवार होते, तर  यंदा तब्बल 4,136 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election Voting LIVE Updates: अजित पवार, चंद्रकांत पाटलांसह बड्या नेत्यांचं मतदान

 

4. राज्यात किती बंडखोर मैदानात?

या उमेदवारांमध्ये तब्बल 2,086 अपक्ष आहेत. 150 हून अधिक मतदारसंघात  बंडखोर रिंगणात आहेत. 

 

5. नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक

काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसांतच काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं होतं. त्यामुळे  नांदेडमध्येही पोटनिवडणूक पार पडते आहे. नांदेडमध्ये भारतीय जनता पक्ष  आणि काँग्रेसमध्ये मोठी लढत होणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT