Manoj Jarange : जरांगे 'पाडा पॅटर्न' चालवणार, नेत्यांचं टेन्शन वाढणार; 'या' मतदारसंघांमध्ये वातावरण तापणार
मनोज जरांगे हे काही मतदारसंघात उमेदवार देतील, तर काही ठिकाणी उमेदवार पाडण्यासाठी आवाहन करतील, त्यामुळे अनेकांचं टेन्शन वाढलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जरांगे कोणत्या मतदारसंघात पाडा पॅटर्न चालवणार?
कोणकोणत्या नेत्यांचं टेन्शन वाढणार?
अंतरवालीत गर्दी, जरांगे यादी जाहीर करणार
Manoj Jarange Candidate List : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने वाढताना दिसतायत. सध्या राज्यात महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ति, एमआयएम यांच्यासह अनेक छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार मैदानात आहेत. तर त्यानंतर आता मनोज जरांगेसुद्धा आपल्या उमेदवारांना मैदानात उतवणार आहेत. मनोज जरांगे यांनी आज आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या हक्काचा जिल्ह्यात एकतरी आमदार असावा अशा दृष्टीने बहुतांश जिल्ह्यांमध्ये उमेदवार देणार आहेत. तर इतर ठिकाणी आपल्याला काही लोकांना पाडायचं आहे असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे. कोणकोणत्या मतदारसंघातून लढायचं याबद्दल बोलत असताना, मनोज जरांगे यांनी आज समर्थकांशी चर्चा केली. एकूणच मनोज जरांगे हे काही मतदारसंघात उमेदवार देतील, तर काही ठिकाणी उमेदवार पाडण्यासाठी आवाहन करतील, त्यामुळे अनेकांचं टेन्शन वाढलं आहे.
हे ही वाचा >>Manoj Jarange : जरांगेंनी घोषित केल्या जागा; 'या' दोन जिल्ह्यात शिलेदार तयार, दानवेंच्या लेकालाही भिडणार?
मनोज जरांगे हे पुढच्या काही तासातच आपले उमेदवार घोषित करणार आहेत. आपण ज्याठिकाणी निवडून येणार असेच मतदारसंघ लढू असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार त्यांनी काही मतदारसंघांतून लढण्यासाठी यादीही घोषित करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला मनोज जरांगे यांनी दोन मतदारसंघांची नावं जाहीर केली आहेत. त्यानुसार बीडमधील केज आणि जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर मतदारसंघात लढण्याचं ठरवलं आहे. आज संध्याकाळपर्यंत एकूणच किती मतदारसंघ लढवायचे आणि उमेदवार कोण असणार हे मनोज जरांगे स्पष्ट करणार आहेत. तर आपल्यासोबत असलेल्या इतर समाजासाठीही मनोज जरांगे राखीव जागांवर त्यांना पाठिंबा देणार आहेत. तर काही मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे लोकसभेप्रमाणे उमेदवार पाडण्यासाठी समाजाला आवाहन करणार आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
कोणकोणत्या मतदारसंघात चालणार पाडा पॅटर्न?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Uddhav Thackeray : "आदित्य ठाकरेंसाठी आम्हाला..." ठाकरेंच्या नेत्याची बंडखोरी, विधानसभेच्या मैदानात उतरून दंड थोपटले
मनोज जरांगे यांनी आपले समर्थक आणि इच्छूक उमेदवारांसोबत बैठक घेऊन विधानसभा निवडणूक लढण्याबद्दल चर्चा केली. यादरम्यान, काही मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडण्याचा निर्णय घेणार असल्याचं समोर आलंय. त्यानुसार काही मतदारसंघांची नावं सध्या चर्चेत आहेत.
ADVERTISEMENT
-
संभाजीनगर पश्चिम
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अंतरवालीतील उपोषणातून महाराष्ट्राला माहिती झालेल्या मनोज जरांगे यांनी आता थेट राजकारणात एन्ट्री केल्याचं दिसतंय. आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आपण निवडणुकीत उतरणार असं सांगितलं होतं. त्यानुसार मनोज जरांगे आता विधानसभेला आपले उमेदवार उतरवत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शेकडो उमेदवारांच्या मुलाखती घेऊन मनोज जरांगे यांनी त्या उमेदवारांना फॉर्म भरून ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार आता आपण सांगू त्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यायचे आणि जो उमेदवार ठरवू त्याला मदत करायची अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.
ADVERTISEMENT