Sharad Pawar : मनोज जरांगेंची विधानसभेतून माघार, शरद पवार यांना आनंद, म्हणाले आम्हाला...
आज विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मनोज जरांगे यांची निवडणुकीतून माघार
शरद पवार यांची प्रतिक्रिया काय?
बंडखोर उमेदवारांना ठाकरेंचा थेट इशारा
Sharad Pawar on Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी आज आपण विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. आपल्यासोबत असलेल्या इतर समाजाकडून उमेदवारांच्या याद्या न आल्यामुळे आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत शरद पवार यांनी केलं आहे. आज विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी मनोज जरांगेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा >>'DGP रश्मी शुक्लांची तात्काळ बदली करा', अचानक कसे आले बदलीचे आदेश?
मनोज जरांगे यांच्या या निर्णयानंतर महायुतीच्या नेत्यांसह ओबीसी नेत्यांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते आहेत. मनोज जरांगे यांनी मैदानातून माघार घेतल्याची टीका त्यांच्यावर होते आहे. तर आपण घेतलेला निर्णय ही माघार नसून गनिमी कावा असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीतून आपल्या सर्व समर्थकांनी, इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज आज मागे घेण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. तर इकडे मुंबईत आज बंडखोर आमदारांच्या मुद्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. यावेळी मनोज जरांगे यांच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, "मनोज जरांगे यांच्या निर्णयाचा आम्हाला आनंद आहे. कारण मनोज जरांगे सतत सांगतायत की, भाजपला आमचा विरोध आहे. त्यांनी जर या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता."
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मनोज जरांगे बारामतीच्या स्क्रिप्टनुसार निर्णय घेतात : लक्ष्मण हाके
मनोज जरांगे निवडणुकीला उभे राहिले असते, तर धुळधाण उडाली असती, त्यामुळे बारामतीच्या सांगण्यावरुन त्यांनी आता या निवडणुकीतून पळ काढला असं लक्ष्मण हाके म्हणाले. मनोज जरांगे यांच्याकडे आता गनिमी काव्याचं नाव घेण्याशिवाय पर्याय नाही. पण गनिमी काव्याचा काळ गेला आहे, त्यांनी गनिमी काव्याला बदनाम करु नये असं लक्ष्मण हाके म्हणाले. मंडल आयोगाला आव्हान देतो म्हणणारा माणूस, ओबीसींच्या घरांवर हल्ला करणार माणूस असं म्हणत हाके यांनी जरांगेंवर आरोप केले. मनोज जरांगे यांनी आजच माघार नाही घेतली, तर नवी मुंबईतून देखील त्यांनी मोर्चा माघारी आणला होता. जत्रा भरवण्याएवढं निवडणूक लढवणं सोपं नाही असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.
बंडखोरांना उद्धव ठाकरेंचा इशारा
जे लोक सांगूनही माघार घेणार नाही, त्यांच्यावर कारवाई होणार असा इशार उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. तेव्हाच आम्ही पुढचा निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT