Mumbai Police : भाजपच्या 'या' मोठ्या नेत्याला धमकी, सिद्दीकींचाही उल्लेख, मुंबई पोलिसांना मेसेज, 10 दिवसांचा अल्टीमेटम,

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई वाहतूक पोलिसांना मेसेज

point

योगी आदित्यनाथ यांना धमकी

point

आरोपीकडून योगींना 10 दिवसांचा अल्टीमेटम

Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या कन्ट्रोल रुमला एक मेसेज आला... आणि या मेसेजमध्ये थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल सेलला हा अनोळखी नंबरवरून एक मेसेज आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसात राजीनामा न दिल्यास आम्ही त्यांना बाबा सिद्दीकींप्रमाणे मारून टाकू, अशी धमकी या मेसेजमधून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी संध्याकाळी हा धमकी मेसेज मिळाला आहे.

 

हे ही वाचा >>Jitendra Awhad: अजित पवार मर्दाची औलाद असते तर... जितेंद्र आव्हाड आक्रमक, 'त्या' घटनेवरुन थेट हल्लाबोल

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. एकीकडे मुंबई पोलिसांनी या कॉलची चौकशी सुरू केली असून, तो मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जातोय. दुसरीकडे, याबाबतची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना पाठवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून इनपुट मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वर्षभरात अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यापूर्वी धमक्या देणाऱ्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे. डायल 112 वर कॉल करून धमकी दिली होती, तर कुणी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून धमक्या दिल्या होत्या. या सर्व प्रकरणातील आरोपींना उत्तर प्रदेश पोलिसांनी काही दिवसांतच अटक होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >>Manoj Jarange : मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी रात्री अंतरवालीत मोठी गर्दी, नेमकं काय घडलं?

 

ADVERTISEMENT

दरम्यान, 23 एप्रिल रोजी एका व्यक्तीने डायल 112 वर धमकीचा मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये आरोपीनं लिहिलं होतं की, "मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच मारणार आहे." या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आणि आरोपीला काही दिवसातच अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे एका व्यक्तीला ट्विटरवर धमकी दिल्याप्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. फेसबुकवर एका व्यक्तीने धमकी दिली होती, त्यालाही पोलिसांनी बिहारमधील फुलवारिया शरीफ येथून उचलबांगडी करत उत्तर प्रदेशमध्ये नेलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT