Nawab Malik : शिंदे-पवारांची चर्चा सुरू? विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार? मलिकांच्या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला

मुंबई तक

Nawab Malik:नवाब मलिक यांच्या या विधानामुळे राज्यात 23 ला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडणार याबद्दलचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे-शरद पवार एकमेकांच्या संपर्कात?

point

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

point

विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय भूकंप होणार?

Ek Nath Shinde and Sharad Pawar in Vidhan Sabha Election:विधानसभेचा निकाल आल्यानंतर राज्यात चित्र बदलणार आहे असं म्हणत नवाब मलिक यांनी सूचक इशारा दिला आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "या निकालानंतर कोण कुणासोबत राहील हे सांगताच येत नाही, काही लोक म्हणतायत की, शिंदे साहेब आणि पवार साहेब यांचं काहीतरी सुरू आहे." नवाब मलिक यांच्या या विधानामुळे राज्यात 23 नोव्हेंबरनंतर नेमक्या काय घडामोडी घडणार याबद्दलचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. 

 

हे ही वाचा >>Manoj Jarange : 'ह्याला पाड आणि त्याला पाड ही आपली भूमिका...'; निवडणुकीबाबत जरांगेंची मोठी घोषणा!

 

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सगळेच पक्ष सध्या मोठ्या ताकदीने मैदानात उतरलेले आहेत. मागच्या पाच वर्षात राज्यात घडून गेलेल्या मोठ्या घडामोडी पाहता वेगवेगळ्या कारणांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. मविआ सरकारमध्ये मंत्री राहिलेले, राज्यात घडलेल्या अनेक घडामोडी जवळून पाहिलेले आणि तुरुंगवारी केलेले नवाब मलिक यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत केले आहेत. त्यातच एका प्रश्नावर बोलताना त्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर काहीही होऊ शकतं असं सांगितलं. तसंच महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचंही काही तरी चाललंय असं लोक सांगत असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत. 

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले? 

हे ही वाचा >>Manoj Jarange Patil : 'एवढ्या वेळेस समाजाची लेकरं बना...'; कंठ दाटला, जरांगे सर्वांसमोर रडले!

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोण कुणासोबत राहील हे सांगताच येत नाही. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होते, लोकांना कसं आणण्यात आलं, निकाल आल्यानंतर काहीही होऊ शकतं. काही लोक सांगतायत की, शिंदे साहेब आणि पवार साहेब यांच्यात काहीतरी सुरू आहे असं म्हणत नवाब मलिक यांनी अनेकांची धाकधूक वाढवली आहे. 

नवाब मलिक यांची स्फोटक मुलाखत पाहण्यासाठी 'मुंबई तक'च्या युट्यूबच्या खालील लिंकवर क्लिक करा...

 

हे वाचलं का?

    follow whatsapp