Sharad -Walse Patil: Sharad पवार थेट म्हणाले, 'गद्दाराला शिक्षा.. वळसे-पाटलांना 100 टक्के पराभूत करा'

रोहित गोळे

ADVERTISEMENT

'वळसे-पाटलांना 100 टक्के पराभूत करा'
'वळसे-पाटलांना 100 टक्के पराभूत करा'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

या निवडणुकीत वळसेंना 100 टक्के पराभूत करा, पवारांच मतदारांना आवाहन

point

शरद पवारांची आंबेगावमध्ये जाहीर सभा

point

आंबेगाव मतदारसंघा वळसे-पाटील वि. देवदत्त निकम

Sharad Pawar vs Dilip Walse-Patil: आंबेगाव: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे झंझावाती प्रचार करत आहे. मात्र, त्यांची आजची आंबेगावमधील म्हणजे दिलीप वळसे-पाटलांच्या बालेकिल्ल्यातील जाहीर सभा ही प्रचंड चर्चेत आहे. (sharad pawar directly said the scab wants to be punished defeat dilip walse patil 100 percent)

ADVERTISEMENT

'वळसे-पाटलांनी गद्दारी केली. जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते. या निवडणुकीत वळसे-पाटलांना 100 टक्के पराभूत करा.. करा.. करा... हेच सांगतो.' असं थेट विधान शरद पवार यांनी केलं आहे.

हे ही वाचा>> Sharad Pawar: 'पक्ष फोडायला अक्कल लागत नाही', पवारांनी फडणवीसांची थेट...

दिलीप वळसे-पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जात होते. मात्र, शरद पवार यांच्यापासून फारकत घेत वळसे-पाटील हे अजित पवारांसोबत गेले आणि त्यांनी थेट भाजपसोबत सत्तेत जाणं पसंत केलं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, त्यांच्या याच कृत्याचा राग आज (13 नोव्हेंबर) शरद पवार यांनी जाहीर सभेतून व्यक्त केलं. पाहा शरद पवार यावेळी नेमकं काय म्हणाले..

'जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते'

'दिलीप वळसेंना मी संधी दिली, पुढं मी त्यांना मंत्री केलं. विविध पदं दिली. विश्वास ठेवला, संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं. ज्यांना मी पद दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. त्यांनी आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही हे लोकांना आवडलं नाही. आमची साथ सोडली आणि मंत्रिमंडळात गेले हे लोकांना आवडलं नाही.' 

ADVERTISEMENT

'आता हे लोकं सांगत असतात.. खोटं सांगतात.. काय सांगतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत. ही गोष्ट अजिबात खरी नाही.' 

ADVERTISEMENT

'माझी बायको वर्षातून एकदा भीमाशंकराच्या दर्शनाला येते. पूर्वीच्या काळात दत्तू पाटील होते त्या वेळेस ते देखील तिथे नेहमी जायचे. आता हा उद्योग त्यांनी (दिलीप वळसे) ज्या दिवशी केला. आम्हा लोकांची साथ सोडली चुकीच्या लोकांबरोबर गेले. त्यानंतर माझी बायको परवा भीमाशंकरच्या दर्शनाला गेली.'

हे ही वाचा>> Uddhav Thackeray: 'मोदीजी तुमच्यावर काय संस्कार?, तुम्ही माँ आणि बाळासाहेबांचा...', ठाकरे बरसले!

'मला माहीत नव्हतं. आल्यावर मी चौकशी केली की, तुम्ही जाऊन आलात..? म्हणाले हो.. तुमची व्यवस्था नेहमीसारखी? नाही, म्हणाल्या नेहमीसारखी नाही.. मी म्हटलं मला काही कळलं नाही. म्हणाल्या, ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्हा गेलो नाही आम्ही डायरेक्ट भीमाशंकराच्या दारात गेलो. हे त्यांनी सांगितलं.' 

'ते म्हणतात निवडणुका आल्या, पवारसाहेबांबाबत  काही बोलणार नाही. काय बोलायचं यांच्याबद्दल.. काय बोलायचं शिल्लक ठेवलंय यांनी. काहीच ठेवलं नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली त्यांनी गद्दारी केली. जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते.' 

'350 वर्षांपूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांशी गणोजी शिर्केंनी गद्दारी केली. ती महाराष्ट्र विसरलेला नाही.. गणोजीला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना सुट्टी नाही. आता एकच विचार आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीत माझा एकच शब्द तुम्हाला आहे की, या निवडणुकीत वळसे-पाटलांना 100 टक्के पराभूत करा.. करा.. करा... हेच सांगतो.' असं म्हणत पवारांनी वळसे पाटलांच्या पराभवासाठी मतदारांना आवाहन केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT