Maharashtra CM : मुरलीधर मोहोळांच्यानंतर आणखी एक नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत, माजी मंत्र्यानं स्वत: ट्विट करत...
सुरूवातीला पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता माजी मंत्री आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याही नावाची चर्चा सुरू झाल्याचं दिसलं. त्यावरच आता स्वत: रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
कोण होणार राज्याचा मुख्यमंत्री?
देवेंद्र फडणवीस की नवा चेहरा?
नाव चर्चेत आल्यानंतर काय म्हणाले रविंद्र चव्हाण?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता आठवडा उलटून गेला आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. एकीकडे महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत जाऊन आलेत. या बैठकीत अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं स्पष्ट सांगितलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी नावं समोर आली आहेत. सुरूवातीला पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता माजी मंत्री आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याही नावाची चर्चा सुरू झाल्याचं दिसलं. त्यावरच आता स्वत: रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Eknath Shinde : "मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय...", ठाण्यात पोहोचताच शिंदेंचं मोठं विधान!
रविंद्र चव्हाण काय म्हणाले?
भाजपचा मुख्यमंत्री होणार हे ठरलं असलं तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? हे आणखी स्पष्ट नाही. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते या चर्चेनंही जोर धरला आहे. अशातच रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. होती. त्यावर रविंद्र चव्हाण म्हणाले, "गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती !"
विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबररोजीच संपली आहे. त्यामुळे तोपर्यंत नवं सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं. मात्र आज 26 तारखेनंतरही आठवडा उलटून गेला आहे. मात्र मुख्यमंत्री ठरू शकत नसल्यानं शपथविधी लांबल्याचं बोललं जातंय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे भाजप मराठा चेहऱ्याला संधी देऊ शकतं अशी एक चर्चा सध्या आहे. त्यामुळे खरंच भाजप मध्यप्रदेश आणि राजस्थान सारखं धक्कातंत्र महाराष्ट्रात वापरणार का याची सर्वांना उत्सुकता आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT