Rohit Pawar Sangola : ऐकावं ते नवलचं! रोहित पवार म्हणाले, ठाकरेंच्या यादीत टेक्निकल एरर, सांगोल्यातून 'हा' उमेदवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सांगोल्यातून मविआचा उमेदवार कोण?

point

रोहित पवारांनी स्पष्ट सांगितलं

point

उद्धव ठाकरेंच्या यादीत टेक्निकल एरर : रोहित पवार

Rohit Pawar Sangola : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या हालचाली सुरू आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. तर 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे तेव्हाच अखेरचं चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र त्यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपाचा विषय अजूनही निकाली निघालेला नाही. महायुतीतील सर्व पक्षांनी आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे, मात्र महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अजूनही प्रत्येक 85 जागांवर अडकला आहे. त्यामुळे उर्वरीत जागांचं काय असा सवाल उपस्थित होतोय. त्यातच उद्धव ठाकरे यांनी आपल्या 65 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामध्ये काही जागांबद्दल चुका झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच प्रसिद्ध झालेल्या या यादीत काही सुधारणा करायच्या असल्याचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर सांगोला दौऱ्यावर असलेल्या रोहित पवारांना सांगोल्यातील जागांबद्दल विचारलं असता, शिवसेनेच्या या यादीत टेक्निकल एरर असल्याचं म्हटलंय. (Rohit Pawar reaction on Sangli Vidhan Sabha Constituency Technical Error in Uddhav Thackeray Candidate List)
 

हे ही वाचा >>Amol Mitkari Akola : राष्ट्रवादीचं काही अस्तित्व आहे की नाही... उमेदवारीसाठी आक्रमक, मिटकरी इरेला पेटले
 

सांगोला मतदारसंघातून शिवसेनेने जाहीर केलेली दीपक साळुंखे यांचं नाव म्हणजे टेक्निकल एरर असेल, शिवसेनेच्या नेत्यांनी याबाबत काल कबूल केलं आहे असं रोहित पवार म्हणाले आहेत. त्यानंतर उमेदवार माघार घेईल किंवा काही तरी निर्णय होईल असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलंय. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षात दाखल झालेल्या दीपक साळुंखे याचं टेन्शन वाढणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता सांगोल्यात आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

रोहित पवार यांनी सांगोल्यात महाविकास आघाडीतून बाबासाहेब देशमुख हेच उमेदवार असतील असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या आषाढी वारीला पंढरपूरमध्ये विठ्ठर रुक्माईच्या महापूजेचा मान हा महाविकास आघाडीच्याच मुख्यमंत्र्याला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

हे ही वाचा >>Shivadi Vidhan Sabha : शिवडीच्या जागेचा मुद्दा शिगेला? अजय चौधरी की सुधीर साळवी? 'या' नेत्याचं पारडं जड

 

ADVERTISEMENT

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटीने 65 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ठाकरेंची ही यादी जाहीर होण्याच्या काही मिनिटातच वाय. बी.सेंटरमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी यादीत काही चुका झाल्या आहेत आणि दुरूस्ती करायची आहे, असे विधान केले आहे. त्यामुळे ठाकरे गटाने यादीत दुरूस्तीच करायची होती मग ती जाहीर का केली असा सवाल आता उपस्थित होतो आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT