Uddhav Thackeray : "आदित्य ठाकरेंसाठी आम्हाला..." ठाकरेंच्या नेत्याची बंडखोरी, विधानसभेच्या मैदानात उतरून दंड थोपटले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदाराची बंडखोरी

point

रूपेश म्हात्रे यांचा ठाकरेंना निर्वाणीचा इशारा

point

भिवंडी पूर्व विधानसभेच्या जागेवरून ठाकरे गटात ठिणगी

भिवंडी पूर्व विधानसभेच्या जागेवरून ठाकरे गटात ठिणगी पडली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागा वाटपाच्या मुदा सोडवण्यात नेत्यांचा मोठा कस लागला होता. बहुतांश जागांवरील जागावाटपाचा मुद्दा सुटला असला तरी काही जागांवरुन अजूनही तिढा कायम आहे. त्यातच आता रुपेश म्हात्रे बंडखोरीच्या भूमिकेवर कायम राहत ठाकरेंनाच निर्वाणीचा इशार दिला आहे. उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Manoj Jarange : जरांगेंनी घोषित केल्या जागा; 'या' दोन जिल्ह्यात शिलेदार तयार, दानवेंच्या लेकालाही भिडणार?

शिवसेनेचे माजी आमदार आणि बंडखोर उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना निर्वाणीचा इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाईंच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंनी समाजवादी पार्टीसोबत तडजोड केल्याचा आरोप रुपेश म्हात्रे यांनी केला आहे. भिवंडीतील शिवसैनिकांवर अन्याय करून सपाचे आमदार रईस शेख यांची वरळी आणि वांद्र्यात मदत घेत असल्याचा म्हात्रेंचा ठाकरेंवर घणाघात रुपेश म्हात्रे यांनी केला आहे. त्यामुळेच आता भिवंडीतील जनतेला गृहीत न धरण्याचा इशारा रुपेश म्हात्रे यांनी दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी जाहीर सभेत सडेतोड भूमिका मांडली आहे.



काय म्हणाले रुपेश म्हात्रे? 

 

हे ही वाचा >>Jitendra Awhad: अजित पवार मर्दाची औलाद असते तर... जितेंद्र आव्हाड आक्रमक, 'त्या' घटनेवरुन थेट हल्लाबोल

"शिंदेंच्या मुलाला कल्याणमध्ये निवडून यावं म्हणून आपल्यावर कपिल पाटील सारखा उमेदवार लादला होता. तशीच वेळ आता आपल्यावर पुन्हा आली आहे. तिकडे वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांना रईस शेख मदत करेल म्हणून पुन्हा आपला बळी देण्याचं काम केलेलं आहे" असं म्हणत रुपेश म्हात्रे यांनी आपल्या  मनातली खदखद व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT