Sada Sarvankar : राजसाहेब माझ्यावर अन्याय करू नका... सदा सरवणकरांचं ट्विट, माहिम विधानसभेत मोठा ट्विस्ट
राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे महायुती मदत करेल अशी शक्यता होती. मात्र सरवणकर यांनी अर्ज भरला. त्यानंतरही या मतदारसंघात नेमकं काय होणार यावर सर्वांची नजर असतानाच आता सदा सरवणकर यांची ही पोस्ट समोर आली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दादर- माहिम विधानसभेत मोठा ट्विस्ट
सदा सरवणकर यांचं राज ठाकरेंसाठी ट्विट
माहिमध्ये काय घडामोडी घडणार?
"राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या" असं म्हणत सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांना आवाहन करणारी ही पोस्ट एक्सवर टाकली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे दादर माहिम मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. तर दुसरीकडे सदा सरवणकर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून याच मतदारसंघातून उमेदवारी आहे. विशेष म्हणजे सदा सरवणकर हे गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून याच मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या अत्यंत जवळ असलेल्या राज ठाकरे यांच्या लेकासाठी महायुती मदत करेल अशी शक्यता होती. मात्र सरवणकर यांनी अर्ज भरला. त्यानंतरही या मतदारसंघात नेमकं काय होणार यावर सर्वांची नजर असतानाच आता सदा सरवणकर यांची ही पोस्ट समोर आली आहे. सरवणकर यांनी या पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Sada Sarvankar X post for raj thackeray amid mahim vidhan sabha amit thackeray)
हे ही वाचा >>Raj Thackeray : शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला, राज ठाकरेंचा हल्लाबोल, राणेंचं नाव घेत 'तो' किस्सा सांगितला
सदा सरवणकर यांना माघार घ्यायला सांगून शिंदे अमित ठाकरे यांना मदत करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तर मागच्या काही दिवसातल्या राज ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांच्या भेटीगाठी पाहता विधानसभेला मनसे महायुतीसोबत असेल, किंवा काही जागांवर महायुती मनसेला मदत करेल अशी शक्यता होती. मात्र दोन्हीही गोष्टी घडल्या नाहीत. शिंदेंनी आपला शिलेदार म्हणून सदा सरवणकर यांना यंदाही उमेदवारी दिली. त्यानंतर सरवणकर यांच्या राजकीय दबाव असल्याचीही चर्चा सुरू होती. त्यातच आता त्यांची ही पोस्ट आली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सदा सरवणकरांनी काय म्हटलंय?
"मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो.
ADVERTISEMENT
बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिम मध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली.
ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली.
राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या."
अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात आहेत. आदित्य ठाकरे यांच्यानंतर थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणारे दुसरे ठाकरे असणार आहेत. त्यांच्या या निवडणुकीसाठी राज ठाकरे मोठी फिल्डिंग लावतील अशी एक सहज शक्यता व्यक्त केली जात होती. राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्याशी भेटीगाठी घेताना दिसले होते. त्यामुळेच ते आगामी निवडणुकीत महायुतीतील पक्षांची मदत घेतील किंवा त्यांच्याशी मैत्रीपूर्ण लढत लढतील असं चित्र होतं. मात्र थेट अमित ठाकरे यांच्याविरोधातच शिंदेंनी उमेदवार दिल्यानं या सर्व शक्यता मावळल्या आहेत. सदा सरवणकर यांनी शिवसेनेकडून आपला अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे महेश सावंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. तरी या मतदारसंघात पुढच्या काळात काय घडामोडी घडणार यावर सर्वांचं लक्ष आहे.
ADVERTISEMENT