Ravindra Waikar : वायकरांचा विजय वादात, शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

sanjay nirupam reaction on north west mumbai lok sabha election result 2024 ravindra waiker kin using mobile phone that unlock ev machine
ठाकरे गटाकडून ईव्हिएम बाबत कांगावा केला जातोय,
social share
google news

Ravindra Waiker  : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waiker)  यांच्या नातेवाईकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी एफआरआय नोंदवला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना आता या घडामोडीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरूपम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (sanjay nirupam reaction on north west mumbai lok sabha election result 2024 ravindra waiker kin using mobile phone that unlock ev machine) 

ADVERTISEMENT

संजय निरूपम माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना निरूपम म्हणाले की, जेव्हापासून अमोल किर्तीकर 48 मतांनी हरले आहेत, तेव्हापासून ठाकरे गटाकडून ईव्हिएम बाबत कांगावा केला जातोय, विनाकारण आरोप सूरू आहेत. तसेच ईव्हिएम जर हॅक झालं असते तर त्यांचा उमेदवार एका मताने जिंकलाच नसता. ईव्हिएमच्या मोजणीत तो एका मताने आघाडीवर होता. आणि तो 48 मतांनी पिछाडीवर गेला तो पोस्टल बॅलेट मतांमध्ये असे निरूपम यांनी सांगितले. 

हे ही वाचा : वायकरांची खासदारकी राहणार की जाणार? 'निकाल' संशयाच्या भोवऱ्यात!

खरं तर पोस्टल बॅलेमध्ये 1550 मतं रविंद्र वायकर यांना तर 1501 मतं अमोल किर्तीकर यांना मिळाली होती. आठ वाजता ही पोस्टल बॅलेटची काऊटींग होऊन जाते. पण ती सुरूवातीसला मतमोजणीत काऊंट होत नाहीत. आणि सर्वात आधी ईव्हिएमच्या मतांची मोजणी होते. त्यानंतर पोस्टल बॅलेटची मतं त्यात जोडली जातात. त्यामुळे एका मताने जिंकलेला उमेदवार पोस्टल बॅलेटमध्ये मागे पडतो. कारण 1550 मतं रविंद्र वायकर यांना तर 1501 मतं अमोल किर्तीकर पडतात. ज्यामुळे 48 मतांनी त्यांचा पराभव होतो, असे संजय निरूपम यांनी सांगितले. कुठेच कुठला गैरप्रकार घडला नाही, हा फक्त खोटा प्रचार सूरू असल्याचेही निरूपम यांनी सांगितले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Narayan Rane : कोकणात राणे-सामंतांमध्ये बॅनर'वार'; महायुतीत संघर्षाच्या ठिणग्या

वनराई सेंटरमध्ये केस फाईल झाली आहे. एक व्यक्ती केंद्रावर मोबाईव घेऊन गेला होता. हा चौकशीचा विषय आहे. हा मोबाईल रविंद्र वायकरांच्या मेहू्ण्याचा होता कि नव्हता याची चौकशी झाली पाहिजे. मी  त्याच्या विरोधात नाही आहे. तो मोबाईल त्याचा नसूही शकतो. मोबाईल गेला असेल तर केस होईल, आणि कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होईल. पहिल्यांदा हा मोबईल कोणाचा हे समोर येईल. हा मोबाईल कोणाचा आहे हा शोधला जाऊ शकतो. सीमकार्डवरून शोधलं पाहिजे, असे निरूपम यांनी म्हटलं आहे. 

या देशात कोणतीही ईव्हिएम मोबाईलशी ऑपरेट होत नाही, ही खरी गोष्ट आहे, फॅक्ट आहे. जर मोबाईलशी ऑपरेट होत नसेल तर ओटीपी कसा येणार? मतमोजणी जेव्हा होते ईव्हिएम उघडले जाते, तेव्हा सरकारच्या अधिकाऱ्यांना मेसेज येतो ईव्हिएम उघडल्याचे,  त्यामुळे ठाकरे गट, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी खोट नरेटिव्ह रचत असल्याचा आरोप संजय निरूपम यांनी केला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT