Sanjay Raut : फडणवीसांना मुख्यमंत्र्यांपासूनच धोका? सुरक्षा वाढवल्यानंतर संजय राऊत यांचा खळबळजनक सवाल
आगामी काळात मुख्यमंत्रीपदावरुन युद्ध होऊ शकतं, त्यामुळेच फडणवीसांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली की काय? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे,
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ
संजय राऊत यांची फडणवीसांवर टीका
फडणवीसांवर मुख्यमंंत्र्यांपासूनच धोका?
Devendra Fadnavis Security : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणांनी दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आता मुंबई पोलीस दलाचे 'फोर्स वन कमांडो' तैनात करण्यात आले आहेत. त्यावरुन आता संजय राऊत यांनी फडणवीसांवरच निशाणा साधला आहे. आगामी काळात मुख्यमंत्रीपदावरुन युद्ध होऊ शकतं, त्यामुळेच फडणवीसांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली की काय? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून त्यांना धोका आहे का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय. (sanjay raut allegations on devendra fadnavis and eknath shinde for force one security)
ADVERTISEMENT
राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत:चीच सुरक्षा वाढवली : राऊत
हे ही वाचा >>CM Eknath Shinde : राज ठाकरेंना मी विचारलंही होतं, पण त्यांनी थेट... संवाद तुटला? दादर-माहिमचा मुद्दा तापला
राज्याचे गृहमंत्री सुरक्षित नाहीत, त्यांनी आपली स्वत:चीच सुरक्षा वाढवली. फोर्स वनचे कमांडो त्यांच्या सागर बंगल्यावर, नागपूरच्या घराबाहेर आणि कुटुंबासोबत तसंच स्वत: देवेंद्र फडणवीस यांच्या घोळका करुन बसलेत, त्यामुळे महाराष्ट्राला चिंता वाटतेय. राज्यात कायदा सुव्यस्था नाही का? काही अघटीत घडेल का? अशी पाल आमच्या मनात चुकचुकतेय. फडणवीसांना कुणापासून धोका आहे का? एका गृहमंत्र्याला आपलीच सुरक्षा का वाढवावी वाटतेय. जी फोर्स अतिरेक्यांशी लढण्यासाठी तयार केली होती, ती सगळी फोर्स उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत का लावण्यात आली असा सवाल संजय राऊत यांनी केला. आमचे प्रिय देवाभाऊ यांना अचानक फोर्स वनचं संरक्षण का द्यावं लागलं हे राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगावं असंही राऊत म्हणाले आहेत. आमची सुरक्षा काढून घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवली. देवेंद्र फडणवीसांवर काय इस्त्रायल, युक्रेन, लिबिया हल्ला करणार का? असा खोचक सवालही राऊतांनी उपस्थित केला.
हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana : डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरचे देऊ, 1500 रुपयांवरच थांबणार नाही तर... एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
भविष्यात मुख्यमंत्रीपदाचं युद्ध वाढत जाणार आहे, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांपासून धोका आहे का? असंही राऊत म्हणाले आहेत. फडणवीसांनी ज्यांना आश्वासन दिली होती, ती पूर्ण झाली नाहीत, त्यांच्यापासून धोका आहे का असं राऊत म्हणालेत. राज्याच्या पोलीस महासंचालक आरएसएस आणि भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी संघ कार्यालयात बसून सांगावं की गृहमंत्री फडणवीस यांना सुरक्षा का द्यावी लागली. राज्यात अनेकांना धमक्या येतायत, खून होतायत, त्यांना सुरक्षा नाही, मग फडणवीसांनाच का? असं म्हणत राऊतांनी हल्लबोल केला. निवडणूक आली की गुप्तचर विभाग जागा होतो असं म्हणत राऊतांनी तपासयंत्रणांवरही निशाणा साधला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT