Sanjay Raut : ...म्हणून शिंदेंना गृहमंत्रिपद हवं, संजय राऊतांनी व्यक्त केली मोठी शंका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंना गृहमंत्रिपद का हवं?

point

काय म्हणाले संजय राऊत?

Sanjay Raut Vs Eknath Shinde : भाजप जगातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष, मोदी-शाह-फडणवीस यांच्यासारखे मजबूत नेते, पण एका गृहमंत्रीपदावरुन राज्याचं सरका अधांतरी लटकून का पडलंय? तुमच्याकडे बहुमताचा आकडा आणि अजित पवार आहेत, मग बहुमत असताना तुम्ही शपथ का घेत नाही? सरकार स्थापनेचा दावा का करत नाही? असे सवाल संजय राऊत यांनी केले.

ADVERTISEMENT

महायुती सरकारमध्ये हे सगळं गृहमंत्रीपदावरुन सगळं थांबलेलं नाही. भाजपने मनात आणलं तर मागण्या करणाऱ्यांना एका मिनिटात चिरडून टाकतील. जे निवडून आलेत ते कसे निवडून आलेत ते सुद्धा भाजपला माहिती आहे. त्यामुळे यामागे काही वेगळी कारणं आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. भाजपने अनेक राज्यात प्रस्थापित मुख्यमंत्र्‍यांना डावलून नवे मुख्यमंत्री केले आहेत, मग शिंदे कोण आहेत? फडणवीसांच्याऐवजी कुणी दुसऱ्याला बसवण्यात येणार का? अशी शंकाही राऊतांनी व्यक्त केली. 

हे ही वाचा >> Avinash Jadhav Resigns : राज ठाकरेंकडे तक्रार ते जीवघेणाहल्ला... अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यामागची कहाणी

एकनाथ शिंदे यांना पोलिसांचे सलाम हवेत, त्यांना पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात हवी जेणेकरुन ते उद्या त्याच यंत्रणेचा वापर करुन भाजपच्या अंगावर जाऊ शकतात असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

हे वाचलं का?

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये निर्माण झालेला तिढा अजूनही मिटलेला दिसत नाही. एकनाथ शिंदे हे नाराज असून, त्यांना अपेक्षित असलेली खाती त्यांच्या पदरात पडणार नसल्याची शक्यता आहे. ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीची तारीखही जाहीर करुन टाकली आहे. त्यामुळे भाजपने ही तारीख निश्चित करताना शिंदेंच्या शिवसेनेला विचारत घेतलं की नाही? असाही प्रश्न उपस्थित होतो  आहे. त्यामुळे बावनकुळेंनी सांगितल्यानुसार 5 डिसेंबरला शपथविधी पार पडणार का? आणि फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार का? हे शपथविधी सोहळ्यावेळीच कळणार आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT