Shiv Sena UBT 1st List: ठाकरेंच्या पहिल्याच यादीत 65 नावं, तुमच्या मतदारसंघात Shiv Sena UBT चा कोण उमेदवार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

तुमच्या मतदारसंघात Shiv Sena UBT चा कोण उमेदवार?
तुमच्या मतदारसंघात Shiv Sena UBT चा कोण उमेदवार?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना (UBT) पक्षाने 65 नावांची पहिली यादी जाहीर

point

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम

point

पाहा तुमच्या मतदारसंघात शिवसेना UBT चा उमेदवार कोण?

Maharashtra Assembly Election 2024 Shiv Sena (UBT) 1st Candidates List: मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाने विधानसभा निवडणूक 2024 साठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्याच यादीत ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जणांची नावं जाहीर केली आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. मात्र, असं असलं तरी 85-85-85 जागांवर सहमती झाल्याची माहिती ही महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या आधीच शिवसेना (UBT) ने आपली यादी जाहीर केली. ज्यामध्ये 65 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. 

हे ही वाचा>> Mahayuti : एकीकडे नवाब मलिक, दुसरीकडे प्रदीप शर्मा; 'या' दोन मतदारसंघांवरुन महायुतीत तिढा?

ठाकरेंची पहिली यादी जाहीर, तुमच्या मतदारसंघात कोण उमेदवार ( Shiv Sena (UBT) 1st Candidates List)

  1. उन्मेश पाटील - चाळीसगाव
  2. वैशाली सूर्यवंशी - पाचोरा
  3. सिद्धार्थ खरात - मेहकर 
  4. नितीन देशमुख - बाळापूर
  5. गोपाल दातकर - अकोला पूर्व
  6. सिद्धार्थ देवळे - वाशिम
  7. सुनील खराटे - बडनेरा
  8. विशाल बरबटे - रामटेक
  9. संजय देरकर - वणी
  10. एकनाथ पवार - लोहा 
  11. संतोष टारफे - कळमनुरी
  12. राहुल पाटील - परभणी
  13. विशाल कदम - गंगाखेड 
  14. सुरेश बनकर - सिल्लोड
  15. उदयसिंह राजपूत - कन्नड
  16. किशनचंद तनवाणी - संभाजीनगर मध्य
  17. राजू शिंदे - संभाजीनगर प. 
  18. दिनेश परदेशी - वैजापूर
  19. गणेश धात्रक - नांदगाव
  20. अद्वय हिरे - मालेगाव बाह्य
  21. अनिल कदम - निफाड
  22. वसंत गीते - नाशिक मध्य
  23. सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम
  24. जयेंद्र दुबळा - पालघर
  25. विश्वास वळवी - बोईसर
  26. महादेव घाटळ - भिवंडी ग्रामीण
  27. राजेश वानखेडे - अंबरनाथ
  28. दिपेश म्हात्रे - डोंबिवली
  29. सुभाष भोईर - कल्याण ग्रामीण
  30. नरेश मणेरा - ओवळा-माजिवडा
  31. केदार दिघे - कोपरी-पाचपाखाडी
  32. राजन विचारे - ठाणे
  33. एम. के मढवी - ऐरोली
  34. उदेश पाटेकर - मागाठाणे
  35. सुनील राऊत - विक्रोळी
  36. रमेश कोरगावकर - भांडुप पश्चिम
  37. अनंत नर - जोगेश्वरी पूर्व
  38. सुनील प्रभू - दिंडोशी
  39. समीर देसाई - गोरेगाव
  40. ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
  41. प्रकाश फातर्पेकर - चेंबूर
  42. प्रविणा मोरजकर - कुर्ला
  43. संजय पोतनीस - कलिना
  44. वरूण सरदेसाई - वांद्रे पूर्व
  45. महेश सावंत - माहिम 
  46. आदित्य ठाकरे - वरळी
  47. नितीन सावंत - कर्जत
  48. मनोहर भोईर - उरण
  49. स्नेहल जगताप - महाड
  50. शंकरराव गडाख - नेवासा
  51. बदामराव पंडीत - गेवराई
  52. कैलास पाटील - धाराशिव
  53. राहुल पाटील - परांडा
  54. दिलीप सोपल - बार्शी
  55. अमर पाटील - सोलापूर दक्षिण
  56. दीपक आबा साळुंखे - सांगोला
  57. हर्षद कदम - पाटण 
  58. संजय कदम - दापोली
  59. भास्कर जाधव - गुहागर
  60. सुरेंद्रनाथ माने - रत्नागिरी
  61. राजन साळवी - राजापूर
  62. वैभव नाईक - कुडाळ
  63. राजन तेली - सावंतवाडी
  64. के. पी. पाटील - राधानगरी
  65. सत्यजीत आबा पाटील - शाहूवाडी 

ही नावं शिवसेना (UBT) ने पहिल्या यादीत जाहीर केली आहेत. मात्र, असं असलं तरी या यादीत काही बदल होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT