Arvind Sawant : उद्धव ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात FIR, शायना एनसी म्हणाल्या...
अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना इम्पोर्टेड माल नहीं चलेगा... असं विधान केलं होतं. त्यातील 'माल' या शब्दावर शायना एनसी यांनी घेतला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल
शायन एनसी यांच्या तक्रारीनंतर एफआयआर
काय म्हणाले होते अरविंद सावंत? वाचा सविस्तर
Mumbai : खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात महिलेचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्याकडून अरविंद सावंत यांच्याविरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना इम्पोर्टेड माल नहीं चलेगा... असं विधान केलं होतं. त्यातील माल या शब्दावर शायना एनसी यांनी घेतला होता. त्यानंतर आज त्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह पोलीस स्थानकात धडकल्या होत्या. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेत अरविंद सावंत यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ वाढवून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. अशातच मुंबईतले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या एका वक्तव्यानं एक नवा वाद उभा राहिला आहे. मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शायना एनसी या निवडणूक लढणार आहेत. तर मविआकडून अमिन पटेल यांना उमेदवारी आहे. या लढतीविषयी बोलतानाच अरविंद सावंत यांनी या मतदारसंघात 'बाहेरचा माल चालणार नाही' असं म्हटल्यानं वादाला तोंड फुटलंय. त्यानंतर आता माल या शब्दावर आक्षेप घेत शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. (Uddhav Thackerays Shiv Sena MP Arvind Sawant is booked for defamation case after complaint of shaina nc)
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
काय म्हणाले होते अरविंद सावंत?
हे ही वाचा >>Sanjay Raut : रश्मी शुक्ला आमचे फोन ऐकतायत... निवडणुकीच्या तोंडावर फोन टॅपिंगचे आरोप, राऊतांचा फडणवीसांवरही निशाणा
शायना एनसी कोणत्या रीन साबणीची गोष्ट करतायत, त्या आम्हाला जनतेच्या कसं काढणार? त्यांना आपला स्वत:चाच रंग माहिती नाही. काल वेगळा रंग, आज वेगळा रंग, कालच त्या वेगळ्या पक्षात गेल्यात. इम्पोर्टेड माल नहीं चलेगा... असं अविंद सावंत एएनआयशी बोलताना बोलले. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्यामधील माल या शब्दावर आक्षेप घेत आक्रमक भूमिका शायना एनसी यांनी घेतली आहेत. त्यानंतर आता शायना एनसी यांनी या वक्तव्यावरुन, संपूर्ण मविआच्या नेत्यांवर निशाणा साधला. माल शब्द वापरणाऱ्या या महाविकास आघाडीला बेहाल करू असं म्हणत त्यांनी अरविंद सावंत यांच्याविर पलटवार केलाय.
शायना एनसी शिवसेनेच्या चिन्हावर मुंबादेवी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढत आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शिवसैनिकही धावून त्यांच्यासाठी आल्या आहेत. अरविंद सावंत यांनी केलेल्या विधानाविरोधात शायना एन.सी आज शुक्रवार यांनी दि. १ नोव्हेंबर २०२४ रोजी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. यावेळी त्यांच्यासोबत तिथे शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्याही उपस्थित होत्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT