Vidhan Sabha election : वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत, पुण्यात शरद पवारांचं गणित बिघडणार?
Vasant more : वसंत मोरे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने महाविकास आघाडीतील जागावाटपाची समिकरणे बदलणार असेच सध्या दिसत आहे. पण, शरद पवारांची राष्ट्रवादी मतदारसंघाचा त्याग करणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
वसंत मोरे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
वसंत मोरे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक
राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेला जागा देणार का?
Pune Politics : 'पुणे की पसंत मोरे वसंत' असं म्हणत वसंत मोरेंनी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंक बांधला होता. पण, मनसेने लोकसभेच्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वसंत मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. आधी पवारांची भेट, नंतर संजय राऊतांची भेट आणि अखेर वंचित बहुजन आघाडीत मोरेंनी प्रवेश करत पुण्याची लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत मोरेंचं थेट डिपॉझिटच जप्त झालं. आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेल्या वसंत मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेत मोरे आल्याने तिकडे पुण्यात मात्र पवारांचं गणित बिघडणार असंच दिसतंय. त्यांचं नेमकं कारण काय आहे? (how politics changed of maha vikas aghadi in pune after vasant more joined uddhav Thackeray's shiv sena)
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या मशीदींवरील भोंग्यांच्या भूमिकेला केलेल्या विरोधामुळे पुण्याचे वसंत मोरे चर्चेत आले होते. 'मी माझ्या भागातील मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणार नाही', असं वसंत मोरे म्हणाले होते. त्यांच्या या भूमिकेनंतरच वसंत मोरे हे मनसेत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. वसंत मोरे यांना त्यांचं शहराध्यक्ष पदही पुन्हा देण्यात आलं नाही. वसंत मोरे सातत्याने पुणे मनसेतील पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त करत होते.
Vasant More : वंचित बहुजन आघाडीत प्रवेश, लोकसभेत पराभव
अखेर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंत मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला. वंचितकडून वसंत मोरेंनी लोकसभेची निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा दारुन पराभव झाला. वसंत मोरे यांना अवघी ३२ हजार १२ इतकी मतं मिळाली. पुणे की पसंत मोरे वसंत म्हणणारे वसंत मोरे त्यांचं डिपॉझिट देखील वाचवू शकले नाही.
हे वाचलं का?
हेही वाचा >> पोलिसांना गुंगारा देणारा मिहीर शाह कुठे लपला होता?
'वंचितच्या मतदारांनी मला स्विकारलं नाही', असं त्यानंतर वसंत मोरे म्हणाले. लोकसभेच्या तोंडावर वसंत मोरेंना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने वंचितचा कार्यकर्ता देखील नाराज झाला होता.
मोरेंची ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
वसंत मोरे आता ठाकरेंच्या शिवसेनेत आले आहेत. एकप्रकारे वसंत मोरेंची घरवापसी झाली आहे. वसंत मोरे यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केली होती. शिवसेना शाखाप्रमुख म्हणून वसंत मोरेंनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर पुढे त्यांनी मनसेत प्रवेश केला. एकेकाळी मनसेचे पुणे महानगरपालिकेतील सभागृहातील विरोधीपक्ष नेते म्हणून देखील वसंत मोरेंनी काम केलं होतं.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? जरांगेंचा पहिल्यांदाच मोठा दावा
वसंत मोरेंना लोकसभेत यश मिळालं नसल्याने आता त्यांनी त्यांचा मोर्चा विधानसभेकडे वळवला आहे. अर्थात कुठल्याही पदाची किंवा कुठलिही निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेत जात नसल्याचं वसंत मोरे म्हणत असले तरी त्यांची महत्त्वकांक्षा कुठेही लपून राहिलेली नाही. वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करुन पुण्यातील हडपसर विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. असं झालं तर विधानसभेला मविआत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ठाकरे-पवारांमध्ये होणार जागेचा पेच?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे हडपसरचे आमदार चेतन तुपे हे अजित पवारांसोबत गेले आहेत. शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले प्रशांत जगताप आता विधानसभा लढवण्यासाठी आग्रही आहेत. प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी एकत्र असताना देखील राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष होते आणि आता पवार गटात ते असताना देखील ते पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत. त्यात चेतन तुपे अजितदादांसोबत गेल्याने हडपसरची जागा प्रशांत जगताप यांच्यासाठी मोकळी झाली आहे. त्यामुळे हडपसरच्या जागेवर पवार गटाचा दावा असणार हे स्पष्ट आहे.
दुसरीकडे पुण्यात ठाकरेंचा एकही आमदार नाहीये. त्यामुळे पुण्यात शिवसेना वाढवण्याचे ठाकरेंचे प्रयत्न सुरु आहेत. वसंत मोरेंसोबत त्यांचे कार्यकर्तेही ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे पुण्यात संघटना वाढवण्यासाठी ठाकरेंना वसंत मोरेंचा फायदा होणार आहे. अशातच हडपसरच्या जागेवर ठाकरेंनी दावा केल्यास पवारांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभेची जागा देणार का?
वसंत मोरे ज्या भागातून येतात तो भाग हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. दुसरीकडे मोरेंच्या भागाला लागूनच खडकवासला मतदारसंघ देखील आहे. हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. दोन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. खडकवासला मतदारसंघ २०१९ ला राष्ट्रवादीने केवळ २ हजार मतांनी गमावला होता, त्यामुळे या मतदारसंघावर देखील राष्ट्रवादीचा दावा असणार आहे. खडकवासला मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. अशावेळी हा मतदारसंघ देखील राष्ट्रवादी सहजासहजी सोडणार नाही.
हेही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana List: 1500 रुपये मिळणार की नाही? असं तपासा यादीत तुमचं नाव!
आता हडपसर किंवा खडकवासला यातील एकाही मतदारसंघावर ठाकरेंनी दावा केला तर मविआता बिघाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वसंत मोरे आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर कुठल्या जागेवर दावा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि मोरेंच्या प्रवेशामुळे मविआत बिघाडी होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT