Prakash Ambedkar : आधी जरांगेंना पाठिंबा आता विरोध, आंबेडकरांच्या यात्रेचा अर्थ काय?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

मनोज जरांगेंना पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर आता विरोधात का गेले आहेत?
प्रकाश आंबेडकरांना आरक्षण बचाव यात्रेतून काय साध्य करायचे आहे?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगेंच्या मागण्यांना आंबेडकर विरोध का करताहेत?

point

प्रकाश आंबेडकरांना विधानसभेला काय साध्य करायचे?

point

प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण वाचवा यात्रेचा राजकीय अर्थ काय?

Prakash Ambedkar Vidhan Sabha Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात यावी. जरांगे यांना मविआचे सामुहिक उमेदवार म्हणून उभं करावं असा प्रस्ताव वंचितकडून देण्यात आला होता. हा प्रस्ताव तर मान्य झालाच नाही तर दुसरीकडे मविआ आणि वंचितची युती देखील होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देखील दिला होता. लोकसभेच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकरांची भूमिका बदललेली दिसत आहे. २५ तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात येणार आहे. दुसरीकडे आंबेडकरांनी सगेसोयऱ्यांच्या जरांगेंच्या मागणीवर देखील आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका का बदलली. ही यात्रा काढण्यामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे? (What is the political significance of Prakash Ambedkar's Reservation Yatra?)

ADVERTISEMENT

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी निर्माण झालेली परिस्थिती सध्या निर्माण झाली असून शांतता प्रस्थापित करणे हा वंचित बहुजन आघाडीच्या यात्रेचा हेतू असल्याचं प्रकाश आंबेडकरांकडून सांगण्यात आलं. २५ तारखेला या यात्रेला सुरुवात होणार आहे. ७ ऑगस्टला या यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीबाबत आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत सर्वपक्षांनी भूमिका मांडावी अशी मागणी केल्याचं देखील आंबेडकर सांगतात.

आरक्षणाचा तिढा : प्रकाश आंबेडकर कुणाच्या बाजूने?

प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंच्या आंदोलनाला भेट दिलेली असताना ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या हाकेंच्या आंदोलनाला देखील प्रकाश आंबेडकरानी भेट दिली होती. त्यामुळे जरांगे आणि हाके यांच्यात वाद असताना आंबेडकर नेमक्या कोणाच्या बाजूने आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

हे वाचलं का?

हेही वाचा >> "सत्तेतल्या बोक्यांनो मस्ती आली काय?", काँग्रेसचे साँग, महायुतीवर वार 

लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळू शकलं नाही. काही जागा सोडल्या तर त्यांच्या उमेदवारांना फारशी मतं घेता आली नाहीत. अनेक ठिकाणी वंचितच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झालं. स्वतः प्रकाश आंबेडकरांनादेखील अकोल्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत वंचितची लाट ओसरल्याचं चित्र दिसून आलं. 

वंचित बहुजन आघाडीचा मतांचा टक्का घटला

२०१९ च्या तुलनेत वंचितटा वोट शेअऱ तब्बल ६४ टक्क्यांनी घसरला. लोकसभेच्या निवडणुकी आधीच प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंची भेट घेतली होती. लोकसभेला मराठा, दलित आणि मुस्लिम मतांचा वंचितला फायदा होईल अशी आशा वंचितला होती. परंतु मोठ्याप्रणाणावर ही मतं मविआला गेल्याने वंचितला फटका बसला. त्यातच आता जरांगेंच्या मागणीमुळे ओबीसी समाज अस्वस्थ असल्याने ओबीसींच्या आरक्षणाची भूमिका आंबेकरांनी घेतली असावी असं जानकरांना वाटतं.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> सुप्रिया सुळेंची अजित पवारांच्या आमदारासोबत खडाजंगी, डीपीडीसी बैठकीत काय घडलं? 

आंबेडकरांच्या भूमिकेबाबत लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख म्हणाले, "जरांगेंची सगेसोयरेंची मागणी ही भेसळ आहे’ असं आंबेडकर म्हणाले, यापूर्वी असे शब्द आंबेडकरांनी कधी वापरले नव्हते. दलित मतांच्या आधारे वंचित बहुजन आघाडीचं सगळं पारडं पुढे जाईल असा जो कयास होता, त्याला लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसला."

ADVERTISEMENT

"आता दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळाली असतील तर त्यांच्या पक्षवाढीसाठी जी मतं हवीत ती ओबीसीमधून मिळू शकतील का याच्या चाचपणीचा हा भाग आहे. आरक्षण बचाव यात्रा त्या पद्धतीची व्यूहरचना असावी", असे सरदेशमुख म्हणाले. 

'जरागेंच्या आंदोलनाची हवा काढण्याचा भाग'

सरदेशमुख पुढे म्हणाले, "आंबेडकर म्हणत होते आरक्षणासंदर्भातील प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे परंतु त्यांनी ते काही दिलं नाही. आंबेडकरांचं असं मत आहे की श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने जरांगे थांबणार की गरीब मराठ्यांच्या बाजूने उभे राहणात. ते जरांगेंना थेट विरोध करु पाहत नाही पण त्यांच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा हा भाग आहे."

हेही वाचा >> भरधाव कारने जोडप्याला उडवलं, थरकाप उडवणारा व्हिडिओ

"दलित मुस्लिम मराठा अशी जिंकण्याची मविआची त्रिसुत्री आहे. याला छेद देण्याचा प्रयत्न महायुती करु पाहत आहे. यात ओबीसी आरक्षणाचं वेगळं ताट हवं असं म्हणत आंबेडकर ओबीसी मतं आपल्या बाजूला वळू शकतात का याची चाचपणी करु पाहत आहे. याचा किती फायदा होईल याची शक्यता कमी आहे", असे विश्लेषण सुहास सरदेशमुख यांनी केले.

आता जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे २५ तारखेपासून प्रकाश आंबेडकर देखील यात्रा काढत आहेत. यात आता ते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT