Maharashtra CM Ceremony : भाजप, शिंदे गट अन् NCP चे कोण कोण होणार मंत्री? वाचा संभाव्य 43 मंत्र्यांची संपूर्ण यादी
Maharashtra CM Swearing in Ceremony : देवेंद्र फडणवीस आज राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात फडणवीसांचा शपथविधी सोहळा रंगणार आहे. वाचा संभाव्य मंत्र्यांची संपूर्ण यादी..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस घेणार शपथ

कोण कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ?

भाजपने जिंकल्या सर्वात जास्त जागा
Maharashtra CM Swearing in Ceremony : देवेंद्र फडणवीस आज राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात फडणवीसांचा शपथविधी सोहळा रंगणार असून अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं निश्चित झालंय. शिंदेही आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकमत झाल्याचं बोललं जातंय. फक्त मंत्रीपद वाटप आणि नेत्यांच्या नावांची अधिकृत घोषणा बाकी आहे.
राज्यात एकूण 288 विधानसभा जागांवर निवडणूक पार पडली. इथे मुख्यमंत्र्यासह एकूण 43 मंत्र्यांची क्षमता आहे. म्हणजेच कॅबिनेट आणि राज्यमंत्री या दोन्हीची एकत्रित संख्या यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आतापर्यंत तिन्ही पक्षांचे 29 मंत्री होते. यामध्ये
भाजप-शिवसेनेचे 10-10 आणि एनसीपीचे 9 मंत्री होते.
भाजपने जिंकल्या सर्वात जास्त जागा
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बहुमत मिळवलं असून 132 जागांवर बाजी मारली. दुसऱ्या नंबरवर शिवसेना (57), तर एनसीपीने (41) जागा जिंकल्या आहेत. दरम्यान आज आझान मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाहा, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पियुष गोयल, एस जयशंकर हे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा >> Maharashtra CM Oath Ceremony LIVE updates : देशातील 'या' दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत रंगणार फडणवीसांचा शपथविधी
कोण आहेत भाजपचे संभाव्य मंत्री?
- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री)
- राधाकृष्ण विखे पाटील
- सुधीर मुनगंटीवार
- चंद्रकांत पाटील
- गिरीश महाजन
- सुरेश खाडे
- रवींद्र चव्हाण
- अतुल सावे
- मंगल प्रभात लोढा
- राहुल नार्वेकर
- जयकुमार रावल
- चंद्रशेखर बावनकुळे
- बबनराव लोणीकर
- पंकजा मुंडे
- देवयानी फरांदे
- किसन कथोरे
- नितेश राणे
- आशिष शेलार
- संभाजी निलंगेकर
- राहुल कुल
हे ही वाचा >> Maharashtra CM Oath-Taking Ceremony online : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा थेट कुठे पाहायचा?
'हे' आहेत शिवसेनेचे संभाव्य मंत्री
- एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री)
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- संजय राठोड
- उदय सामंत
- तानाजी सामंत
- अब्दुल सत्तार
- दीपक केसरकर
- शंभुराज देसाई
- भरत गोगावले
- अर्जुन खोतकर
- संजय शिरसाट
- योगेश कदम
राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य मंत्री
- अजित पवार (उपमुख्यमंत्री)
- धनंजय मुंडे
- दिलीप वळसे पाटील
- छगन भुजबळ
- हसन मुश्रीफ
- धर्मराव आत्राम
- आदिती तटकरे
- अनिल पाटील
- राजकुमार बडोले
- माणिकराव कोकाटे