Pankaja Munde Mumbaitak Baithak 2024 : प्रीतम मुंडेंचं पुनर्वसन होणार का? पंकजा मुंडेंचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

pankaja munde at mumbaitak baitha 2024 on vidhan sabha election 2024 pritam munde candidate maharashra politics
भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी मुंबई Tak बैठकीत मोठं विधान केले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मी मुंडे साहेबांच्या अंडर काम केले आहे.

point

मी प्रीतमला विस्थापित करणार

point

माझ्या अंडर तिने अनेक वर्ष काम केले आहे.

Pankaja Munde Mumbaitak Baithak 2024 : लोकसभा निवडणुकीत डॉ.प्रीतम मुडेंचं (Pritam Munde) तिकीट कापून मोठ्या भगिणी पंकजा मुंडे यांना भाजपला उमेदवारी दिली होती.त्यानंतर आता लोकसभेत डावललेल्या प्रीतम मुंडेंचं विधानसभेत पुनवर्सन होणार का? अशा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतं आहे. या प्रश्नावर आता भाजप आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde)  यांनी मुंबई  Tak बैठकीत (Mumbaitak Baithak 2024) मोठं विधान केले आहे. नेमकं त्या काय म्हणाल्या आहेत. हे जाणून घेऊयात. (pankaja munde at mumbaitak baitha 2024 on vidhan sabha election 2024 pritam munde candidate maharashra politics) 

ADVERTISEMENT

''माझं आणि माझ्या कुटुंबाच कधीच असं मत नाही आहे.  जस अमुक अमुक पदावर आम्ही आहोत, म्हणजे आमची कायमची जहागीर झाली आहे. पक्षाने निर्णय घेतले तेव्हा 10 वेळा मी जाहीर सांगितले होते. मी प्रीतमला विस्थापित करणार,पण पक्षाने ज्यावेळी माझी उमेदवारी जाहीर केली, तेव्हा मी निवडणूक लढण्याचा निर्णय स्विकारला. त्यामुळे आता काय करायचं. पुनर्वसन काय असतं? कुठला मोठा पूर येऊन आम्हाला वाहून गेला आहे की कुठल्या भूकंपात आम्ही जमीनदोस्त झालो आहे. पूनर्वसन हा शब्द चुकीचा आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : Aaditya Thackeray Mumbai tak Baithak 2024 : ठाण्यातून लढणार की वरळीतून? आदित्य ठाकरेंचा निर्णय झाला

प्रीतमने खूप सिन्सिअरली तीचं काम केले आहे. तिच्याविषयी चांगलं सगळ्यांचं मतं आहे. पक्षाने तो निर्णय का घेतला? कारण मी नेता आहे, प्रीतम खासदार होती, माझी लहान बहीण आहे. माझ्या अंडर तिने अनेक वर्ष काम केले आहे. मी मुंडे साहेबांच्या अंडर काम केले आहे.त्यामुळे राज्यावर प्रभाव टाकणारे निर्णय घेणे आवश्यक होते. त्यात पक्षाने निर्णय घेतला आणि तुम्हाला लढायला सांगितलं तर ते स्विकारण आवश्यक आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Devendra Fadnavis Mumbai tak Baithak 2024: लोकसभेला इतका फटका का बसला? फडणवीस स्पष्टच बोलले

''पक्षाची भूमिका असते की आपण कधी काय करायची? हे ते पटकन उघडून सांगत नाही. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिका ठेवून काम केली पाहिजे. मी जेव्हा 2019 मध्ये चॉईस दिला की मला केंद्राच्या राजकारणात काम करायचं आहे. तर मला केंद्राच्या राजकारणात नेलं, केंद्राच्या राजकारणातून नंतर मध्यप्रदेशची जबाबदारी दिली.त्यामुळे मी या काळाला संघर्षाचा काळ मानत नाही. तो माझ्या शिकण्याचा काळ होता'', असे पंकजा मुंडे म्हणतात. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT