Nitesh Rane : “… असं बोलण्याआधी संजय राऊतला लाज वाटली पाहिजे”, राणे भडकले
भाजपचे आमदार नितेश राणे संजय राऊत यांच्यावर भडकले. मुलुंडमध्ये झालेल्या घटनेवरून संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता राणेंनी उलट सवाल केला आहे.
ADVERTISEMENT
Nitesh Rane on Sanjay Raut : मुलुंडच्या घटनेने राजकारण ढवळून निघालं आहे. मराठी महिलेला ऑफिससाठी जागा देण्यास नकार दिल्यानंतर मुंबईतील ‘मराठी माणूस’ मुद्दा ऐरणीवर आला. विरोधकांनी यावरून सत्ताधारी भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला घेरलं आहे. शिवसेना (युबीटी) खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकावरच याचं खापर फोडलं. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे चांगलेच भडकले. (BJP MLA Nitesh Rane Slams Shiv Sena UBT MP Sanjay Raut)
ADVERTISEMENT
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुलुंडमध्ये जो प्रकार घडला, त्याला भाजप आणि शिंदेंची सेना जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याला नितेश राणेंनी उत्तर दिलंय. नितेश राणे नेमकं काय बोलले तेही वाचा…
संजय राऊतांना उत्तर देताना नितेश राणे म्हणाले…
“मुलुंडच्या घटनेला भाजप-शिंदे यांची शिवसेना आहे, असं बोलण्या अगोदर संजय राजाराम राऊतला लाज वाटली पाहिजे. मुंबईमधील मराठी टक्का का घसरला? वर्षानुवर्षे उद्धव ठाकरेंची सत्ता होती ना? महापालिकेत होती ना उद्धव ठाकरेंची सत्ता, मग तरीही मुंबईतील मराठी माणूस आज वसई, विरार, मीरा रोड, भाईंदर, कल्याण, डोंबिवलीत का राहायला गेला?”, असा थेट सवाल नितेश राणेंनी संजय राऊतांना केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Mulund : ‘…तर गालावर वळ उठतील’, राज ठाकरे कडाडले; शिंदे सरकारलाही सुनावलं
हेही वाचा >> Kiran Samant : उदय सामंतांच्या भावाच्या स्टेट्सला ठाकरेंची मशाल, कारण काय?
हेही वाचा >> पितृपक्षात कावळ्यांना नेवैद्य का दिला जातो? तुम्हाला यामागची माहितीये का?
“मुंबईमध्ये त्याला घर का घ्यावं वाटलं नाही? का त्याला आर्थिक सक्षम केलं नाही? का फक्त वडापावच्या गाड्यापुरतं ठेवलं? मग पत्राचाळीत मराठी लोकं राहत नव्हती का? खंबाटा आणि एअर इंडियामध्ये मराठी कामगार काम करत नव्हते का? मग त्याचं जबाबदार कोण आहेत? मराठी माणसाच्या भविष्याचा खून केलेलं रक्त तुमच्या अंगावर आहे. ते पहिलं पुसा आणि मग भाजप आणि शिंदेंवर बोट ठेवा”, अशा शब्दात नितेश राणेंनी टीकेची तोफ डागली.
ADVERTISEMENT