“Nana Patole यांच्यासोबत काम करणं अवघडं”; बाळासाहेब थोरांतांचा लेटरबॉम्ब
Balasaheb Thorat has written a letter to Congress president Mallikarjun kharge : मुंबई : विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर सुरु झालेला काँग्रेसमधील वाद आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार केली आहे. या पत्रामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. […]
ADVERTISEMENT
Balasaheb Thorat has written a letter to Congress president Mallikarjun kharge :
ADVERTISEMENT
मुंबई : विधान परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर सुरु झालेला काँग्रेसमधील वाद आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार केली आहे. या पत्रामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. रविवारीही थोरात यांनी व्हीडिओ कॉन्फन्सिंगमधून कार्यकर्त्यांशी संवाद साधून सत्यजीत तांबे प्रकरणावर भाष्य केलं होतं. (Balasaheb Thorat has written a letter to Congress president Mallikarjun kharge)
बाळासाहेब थोरात यांच्या पत्रात काय आहे?
बाळासाहेब थोरात यांच्या पत्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत काम करणं अवघडं असल्याचं स्पष्ट केलं आहे. विधान परिषद निवडणुकीदरम्यान झालेलं राजकारण व्यथित करणारं होतं. संगमनेरमधील कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. तसंच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असा इशाराही थोरात यांनी दिला आहे.
Mohan Bhagwat: जाती ईश्वराने नव्हे पंडितांनी बनवल्या, सरसंघचालकांचं विधान
काही जण गैरसमज पसरवत आहेत. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकारिणी माझ्याशी कोणतीही सल्लामसलत न करता बरखास्त केली. पक्ष कुणाच्या घरचा नाही अशी वक्तव्य जाहीरपणे करण्यात आली. प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आलं. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली.
ADVERTISEMENT
तांबेंचं अभिनंदन करत म्हणाले बाळासाहेब थोरात?
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काल संगमनेरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र थोरात उपचारासाठी मुंबईत असल्यानं त्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळीही त्यांनी याबाबत सविस्तर भाष्य केलं होतं.
ADVERTISEMENT
Balasaheb Thorat यांनी मौन सोडलं! तांबेंचं अभिनंदन करत म्हणाले, ‘जे झालं ते…’
बाळासाहेब थोरात म्हणाले, मधल्या काळात खूप राजकारण झालं. सत्तांतरापासून तालुक्यावर सूड उगवला जात आहे. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. चांगले चालू असणारे अनेक उद्योग – व्यवसाय बंद पाडले जात आहेत. पण आपण संघर्षातून मोठे झालो आहोत. याही संघर्षातून आपण बाहेर येऊ आणि आणखी नव्या उमेदीने उभं राहू, असा आशावाद यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
विधान परिषदेबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठं राजकारण झालं. पण सत्यजित मोठ्या मताने विजयी झाला, त्याचं मनापासून अभिनंदन करतो. पण जे काही राजकारण झालं ते मला व्यथित करणारं आहे, ही वस्तुस्थिती आहे. या बाबतच्या माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. याबद्दल बाहेर जाहीर भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही. हा पूर्णपणे पक्षीय प्रश्न असून याबतीत पक्ष आणि मी मिळून योग्य तो निर्णय घेऊ. बाकी लोकांनी याबाबत विचार करण्याची गरज नाही, असंही त्यांनी इतर पक्षीय नेत्यांना सुनावलं.
मधल्या काळात अनेक बातम्या आल्या. अगदी भाजप पर्यंत पोहचवण्याचं काम झालं. भाजपच तिकिट वाटपही त्यांनी केलं. काही लोकं मुद्दाम ही काम करतात. पण आपला विचार कॉंग्रेसचा आहे. आतापर्यंत याच विचाराने जात आहोत आणि यापुढेही आपल्याला काँग्रेसच्याच विचाराने पुढे जायचं आहे याबाबत मी तुम्हाला ग्वाही देतो, असं म्हणत त्यांनी त्यांच्या आणि सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT