26 वर्षांचा विश्वराज हाकणार ‘भीमा’चा कारभार : अमेरिकेतून थेट कारखान्याच्या राजकारणात
सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सुरेश जगताप यांची बिनविरोध निवड झाली. विश्वराज यांच्यारुपाने भीमा कारखान्याला अवघ्या २६ वर्षांचा, अमेरिकेत राहिलेला आणि थ्री-पीस सुट घातलेला तरुण चेअरमन म्हणून लाभला आहे. या निमित्ताने महाडिक यांच्या तिसऱ्या पिढीनेही राजकारणात पदार्पण केलं आहे. […]
ADVERTISEMENT
सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी सुरेश जगताप यांची बिनविरोध निवड झाली. विश्वराज यांच्यारुपाने भीमा कारखान्याला अवघ्या २६ वर्षांचा, अमेरिकेत राहिलेला आणि थ्री-पीस सुट घातलेला तरुण चेअरमन म्हणून लाभला आहे. या निमित्ताने महाडिक यांच्या तिसऱ्या पिढीनेही राजकारणात पदार्पण केलं आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत विश्वराज महाडिक?
विश्वराज धनंजय महाडिक हे त्यांचं पूर्ण नावं. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म १७ मे १९९६ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. शालेय शिक्षणही कोल्हापुरातच झालं. पदव्यूत्तर शिक्षणासाठी विश्वराज यांनी अमेरिका गाठलं होतं. जगभरातील काही टॉप युनिवर्सिटीपैकी एक अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे.
धनंजय महाडिक यांच्या दाव्यानुसार कॉलेजमध्ये असतानाच विश्वराज यांना एक कोटी पॅकेजची ऑफर आली होती, मात्र त्यांनी ती नाकारुन कोल्हापुरात परतण्याचा निर्णय घेतला. तर दोन वर्ष नोकरी करुन आपल्याला घराची ओढ असल्यामुळे आपण भारतात परत येण्याचा निर्णय घेतला, आणि २०१९ मध्ये मी परत आलो, असं विश्वराज महाडिक माध्यमांशी बोलताना म्हणाले.
भीमा कारखाना निवडणूक निकाल :
भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांनी गाजली होती. धनंजय महाडिक यांच्या गटापुढे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी आव्हान उभं केलं होतं. भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही पाटील यांना साथ दिली होती.
मात्र हे आव्हान मोडित काढतं महाडिक यांच्या पॅनेलने दणदणीत विजयी मिळविला. यंदाच्या निवडणुकीत महाडिक गटाचे सर्वच्या सर्व 15 उमेदवार विजय झाले आहेत. हे सर्व उमेदवार जवळपास सहा हजारच्या फरकाने विजयी झाले आहेत. तर विश्वराज महाडिक हे तब्बल १० हजार ६२९ मते घेऊन विजयी झाले आहेत.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT