Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडला सरकार अटक का करत नाही? खासदार निलेश लंकेंनी थेट सांगितलं, म्हणाले...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Nilesh Lanke On Santosh Deshmukh Murder Case
Nilesh Lanke On Santosh Deshmukh Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

खासदार निलेश लंकेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर दिली मोठी अपडेट

point

"त्यांना तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे..."

point

निलेश लंके नेमकं काय म्हणाले?

Nilesh Lanke On Santosh Deshmukh Murder Case:  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. देशमुखांचं 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. देशमुखांच्या हत्या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) आणि न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी दिले आहेत. मास्टरमाईंड कोणीही असो, त्याच्यावर कारवाई केली जाईल. वाल्मिक कराडविरोधात पुरावे आढळल्यास गुन्हे दाखल होतील, असंही फडवीसांनी काल शुक्रवारी सभागृहात म्हटलं होतं. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने या हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिलीय.

ADVERTISEMENT

खासदार निलेश लंके नेमकं काय म्हणाले?

""एखाद्या व्यक्तीकडून क्रूर पद्धतीने घटना घडत असेल, तर कधी कधी त्या भागात वातावरण एकदम दुषित झालेलं असतं. या घटनेत ज्या आरोपींचा प्रत्यक्षरित्या संबंध आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. बीड आणि त्या परिसरात वातावरण दुषित झालं आहे, ते वातावरण शांत झालं पाहिजे". वाल्मिक कराडला सरकार अटक का करत नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना निलेश लंके म्हणाले, "घटना होऊन इतके दिवस लोटले तरीही सरकारने ठोस पाऊल उचललं नाही. याचा अर्थ सरकार कुठेतरी कमी पडत आहे. परभणी, बीडमध्ये दुर्देवी घटना घडल्या आहेत. धनंजय मुंडे यांची दहशत आहे".

हे ही वाचा >> Sharad Pawar Beed : संतोष देशमुखांच्या मुलीला काय शब्द दिला? मस्साजोगमध्ये शरद पवार काय बोलले?

म्हणून तिथले सर्व आमदार विधानसभेत त्यांना विरोध करतात, असं त्यांचे समर्थक म्हणतात, यावर प्रतिक्रिया देताना निलेश लंके म्हणाले, याला राजकीय रंग न देता या घटनेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कोणी पाठिशी घालत असेल, तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो किंवा कुणीही असो. ज्या प्रत्यक्ष संबंध आहे..या गोष्टीला ज्याचा आधार आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही आमची मागणी आहे. लोकसभेच्या निवडणुकीपासून पाहिलं आहे, जातीय संघर्ष निर्माण होत आहे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. ज्यांचा या घटनेशी संबंध आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतका निर्यदी खून झाला आहे, तर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असंही निलेश लंके म्हणाले.

हे ही वाचा >> Mumbai Airport : थोडं थोडकं नाही तर तब्बल 11 कोटींचा गांजा, दीड कोटींचं सोनं जप्त, कसं लपवलं होतं ते ऐकून थक्क व्हाल

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT