Pushpa 2 OTT Release Date : पुष्पा-2 खरंच ओटीटीवर येणार की अफवा? निर्मात्यांनीच स्पष्ट केलं...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुष्पा-2 चित्रपट ओटीटीवर कधी येणार?

point

पुष्पा-2 ओटीटीवर येणार की फक्त अफवा?

'पुष्पा 2' अनेकांनी थिएटरमध्ये पाहिला असला, तरी अजूनही काही जण चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत आहे. तुम्हीही वाट पाहत असाल तर तुम्हाला आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यानंतर म्हणजेच 2025 मध्ये 9 जानेवारी 2025 च्याही पुढे ढकलण्यात आला आहे. हा चित्रपट 9 जानेवारीला कोणत्याही OTT वर प्रदर्शित होत नाहीये. एवढ्या लवकर हे करणं शक्य नसल्याचं चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

ADVERTISEMENT

पुष्पा 2 हा चित्रपट OTT वर येणार की नाही याबद्दल आता निर्मात्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, ज्या चाहत्यांनी 9 जानेवारी रोजी OTT वर चित्रपट पाहण्याचा प्लॅन केला होता, त्यांना नाराज व्हावं लागणार आहे.

9 जानेवारीला पुष्पा-2 OTT होणार नाही


पुष्पा 2: The Rule च्या प्रोडक्शन हाऊस Mythri Movies ने त्यांच्या अधिकृत X हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, हा चित्रपट 9 जानेवारी रोजी OTT वर प्रदर्शीत केला जाणार नाही. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की. पुष्पा 2 च्या ओटीटी रिलीजबद्दल अफवा पसरत आहेत. त्यामुळे सुट्टीचा हा सर्वात मोठा हंगाम असून, फक्त मोठ्या पडद्यावर सर्वात मोठा चित्रपट #पुष्पा2 चा आनंद घ्या. #WildFirePushpa फक्त थिएटरमध्ये आहे.

 



रिलीजच्या तिसऱ्याच दिवशी वसूल झाला खर्च


5 डिसेंबर रोजी दिग्दर्शक सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन 15 दिवस झाले असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने पहिल्या 3 दिवसातच बजेट वसूल केलं होतं. पुष्पा-2 आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की, अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट 9 जानेवारी 2025 रोजी OTT वर प्रदर्शित होणार आहे. मात्र, निर्मात्यांनी आता तसं होणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.

ADVERTISEMENT



ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT