Umesh Pal : गोळी लागली तरी तो उमेश पालची ढाल बनला; पण शेवटी बॉम्ब…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Praygraj Shootout : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरदिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. ज्यामध्ये एका केस प्रकरणातील साक्षीदार उमेश पाल आणि त्याचा गार्ड संदीप निषाद यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सध्या मृत उमेश पाल (Umesh pal murder) याची चर्चा होत आहे. मात्र या हत्याकांडात जीव गमावलेले यूपीचे पोलीस हवालदार (Sandip Nishad) संदीप निषाद यांचे कुटुंब एकाकी झाले आहे. आझमगड (azamgadh) येथील रहिवासी असलेल्या गनर संदीपने कर्तव्य बजावत असताना प्रयागराज हत्याकांडात आपले प्राण दिले. उमेश पाल याला मारण्यासाठी आलेल्या (Attacker) हल्लेखोरांनी सुरक्षेत ढाल बनून उभ्या असलेल्या गनर संदीपलाही (Bullet and bomb) गोळी आणि बॉम्बने बळी बनवले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. sandip Nishad died during treatment.

ADVERTISEMENT

तीन गोळ्या आणि तंदूरच्या भट्टीत टाकला मृतदेह, कसं घडलं होतं दिल्लीतील नयना सहानी हत्याकांड?

शुक्रवारी झालेल्या हत्याकांडानंतर उमेश पाल यांच्या समर्थकांचा मोठा जमाव प्रयागराज येथील स्वरूपप्रणी हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम हाऊसबाहेर जमला असताना दुसरीकडे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या हवालदाराचे कुटुंब एकटेच उभे होते. त्याचे वडील संतलाल निषाद आणि भाऊ प्रदीप निषाद यांच्यासह काही नातेवाईक पीएम रूमबाहेर उपस्थित होते.

वडील शेतकरी तर भाऊ संदिपवर होता अवलंबून

घटनेतील पीडित संदीप निषादचे वडील संतलाल हे व्यवसायाने शेतकरी आहेत. संदीप हा 3 भावांमध्ये मधला होता. पोलिस खात्याकडून मिळणाऱ्या पैशावरच संदीपचे कुटुंब अवलंबून होते. कॉन्स्टेबल संदीप नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तो आपल्या धाकट्या भावालाही शिकवत होता. आता संदीप निषाद याच्या निधनानंतर कुटुंबीयांची रडून अवस्था झाली आहे. हल्लेखोरांच्या दहशतीमुळे कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याने परिसरातील नागरिकही अस्वस्थ आहेत.

आर्थिक मदत आणि नोकरीची मागणी

संदीप निषादच्या निधनाने दु:खी झालेले वडील आणि भाऊ म्हणतात की, आम्ही आमचा मुलगा संदीपला कधीही विसरू शकणार नाही. आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन होते. त्यामुळे आमच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

ADVERTISEMENT

44 सेकंदात हत्याकांड

बसपा आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल आणि त्याचा गनर संदीप निषाद यांची अवघ्या 44 सेकंदात हत्या करण्यात आली. एकजण आधीच जवळच्या दुकानात उमेशची वाट पाहत उभा होता. उमेश पाल कारमधून खाली उतरताच गोळीबार सुरू झाला. सुरक्षारक्षक संदीप निषाद हे ढाल बनले असता त्यांनाही गोळी लागली.

ADVERTISEMENT

घटनास्थळावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार उमेश पाल गोळी लागल्यावरही घराकडे धाव घेतात, पण हल्लेखोर अरुंद गल्लीत घुसून गोळीबार करतात आणि बॉम्ब फोडतात. दुसरीकडे, गोळी लागल्याने कारजवळ बेशुद्ध झालेला संदीप निषादही पळत सुटला, ज्याला लक्ष्य करत बदमाशांनी रस्त्यावर बॉम्ब फेकला. त्यानंतर जखमी अवस्थेत संदीप उमेशच्या घराबाहेर पडला.

१९९६ ला कसं उघडकीस आलं लहान मुलाचं हत्याकांड? गावित बहिणींच्या अटकेनंतर काय काय घडलं?

हल्लेखोर अंदाधुंद गोळीबार करत होते

आपल्या व्यथा सांगताना मृत उमेश पालच्या पुतणीने सांगितले की, जेव्हा काका गोळी लागल्यानंतर पळून जात होते, तेव्हा हल्लेखोरांनी धावतच त्यांच्यावर गोळीबार केला. हे सर्व आमच्या डोळ्यासमोर घडले आणि आम्ही काकांना वाचवू शकलो नाही, असं ती म्हणाली.

उमेशने भाजपमध्ये प्रवेश केला होता

राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ते माजी केंद्रीय मंत्री एसपी बघेल, सिद्धार्थनाथ सिंह यांच्याशी त्याचे जवळचे संबंध होते. उमेश पाल याच्या हत्येनंतर कुटुंबात गोंधळाचे वातावरण आहे. उमेश पाल यांना भेटायला रोज येणारे नेते दिसत नसल्याची तक्रार आता कुटुंबीय करत आहेत. मात्र, स्थानिक आमदार सिद्धार्थनाथ सिंह रविवारी शोक व्यक्त करण्यासाठी पोहोचले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT