लखीमपूर खेरी प्रकरण: फसवणूक, बलात्कार, खून आणि एन्काउंटर…जाणून घ्या घटनेची इनसाईड स्टोरी

मुंबई तक

लखीमपूर खेरी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत दोन दलित बहिणींच्या हत्येचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने दोन दलित बहिणींना फूस लावून नंतर वासनेची शिकार बनवून झाडाला लटकवले. त्या दरम्यान, बलात्कारातील आरोपी जुनैदची पोलिसांशी चकमक झाली, ज्यामध्ये त्याच्या पायाला गोळी लागली. लखीमपूर खेरी येथे झाडाला लटकलेल्या दोन बहिणींचे मृतदेह आढळल्यानंतर विविध […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लखीमपूर खेरी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत दोन दलित बहिणींच्या हत्येचा उलगडा केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने दोन दलित बहिणींना फूस लावून नंतर वासनेची शिकार बनवून झाडाला लटकवले. त्या दरम्यान, बलात्कारातील आरोपी जुनैदची पोलिसांशी चकमक झाली, ज्यामध्ये त्याच्या पायाला गोळी लागली.

लखीमपूर खेरी येथे झाडाला लटकलेल्या दोन बहिणींचे मृतदेह आढळल्यानंतर विविध तर्क समोर येत होते. मात्र पोलिसांनी तपास अधिक वेगाने केला. काही तासांतच पोलिसांनी झाडाला लटकलेल्या मृतदेहामागची कहाणी माध्यमांसमोर येऊन सांगितली. एसपी संजीव सुमन यांनी सांगितल्यानुसार, सर्व प्रथम दोन्ही आरोपी बहिणींना भेटण्यासाठी दुचाकीवरून आले.

दोन्ही बहिणींची आरोपी सोहेल आणि जुनैद या दोघांशी आधीच ओळख होती. त्यानंतर दोघांनी दोन्ही बहिणींवर बलात्कार केला. बलात्कारानंतर दोघांनी लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. बहिणींनी नकार दिल्यानंतर सोहेल आणि जुनैद यांनी मिळून त्यांची हत्या केली. यानंतर करीमुद्दीन आणि आरिफ यांना बोलावण्यात आले. दोघींनी बहिणींचे मृतदेह झाडावर लटकवले.

आरोपींनी आधी दोन्ही बहिणींशी मैत्री केली, दोघींचा विश्वास जिंकला आणि नंतर त्याच नात्याच्या जोरावर बलात्कार, दुहेरी हत्याकांड असे गुन्हे घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी छोटू गौतमसह सोहेल, जुनैद, हफीझुल, करीमुद्दीन आणि आरिफ यांना अटक केली आहे. दोन बहिणींशी सोहेल आणि जुनैदची भेट घडवून आणल्याचा आरोप छोटू गौतमवर आहे.

लखीमपूर पोलिसांच्या दाव्यावर कुटुंबीय नाराज

दोन्ही मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा दावा मृतांचे कुटुंबीय फेटाळत आहेत. मृत बहिणीच्या भावाचे म्हणणे आहे की, घटना घडली तेव्हा पोलीस येथे उपस्थित नव्हते, आम्ही येथे होतो. आम्ही संपूर्ण घटना पाहिली आहे, माझ्या बहिणींना तीन तरुणांनी घरातून ओढत नेले.

यापूर्वी मृतांच्या आईनेही सांगितले होते की, ‘बुधवारी दुपारी 3 तरुणांनी त्यांच्या मुलींना पळवून नेले आणि नंतर त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवले. या घटनेतील आरोपी शेजारील लालपूर गावातील रहिवासी आहेत. आज तकशी केलेल्या संभाषणात आईने सांगितले की, तीन मुलांपैकी दोन मुलांनी त्यांच्या मुलींना ओढत नेले. त्यानंतर एका मुलाने दुचाकी सुरू केली आणि दोघांसह घटनास्थळावरून पळ काढला.

लखीमपूर खेरी प्रकरण आहे तरी काय?

लखीमपूर गावाच्या हद्दीत दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. दलित समाजातून आलेल्या या दोन्ही मुली दुपारी 3 वाजेपर्यंत घराच्या अंगणात होत्या. मात्र संध्याकाळपर्यंत दोघीही निर्जीव प्रेतं बनून झाडावर लटकत होत्या. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार या दोन बहिणींवर अत्याचार झाले आहेत.

दोघींचे अपहरण करून बलात्कार केला आणि त्यानंतर दोघींची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंब त्याच गावातील एका व्यक्तीकडे बोट दाखवत होते, ज्याचे नाव छोटू आहे आणि त्याचे घर काहीशे मीटर अंतरावर आहे. पोलिसांनी आरोपी छोटूला अटक केल्यावर हा सारा प्रकार समोर आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp