Nashik : चार महिन्यांच्या लेकीचा आईनेच कापला गळा, पोलीस तपासात कळलं कारण
-प्रविण ठाकरे, नाशिक Nashik Murder case: नाशिकमधील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगरमध्ये एका चार महिन्यांच्या चिमुकलीची घरात घुसून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला आणि एक धक्कादायक माहिती समोर आली. चिमुकलीच्या आईनेच गळा कापून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. याचं कारणही महिलेनं पोलिसांना सांगितलं. (mother killed her own daughter […]
ADVERTISEMENT
-प्रविण ठाकरे, नाशिक
ADVERTISEMENT
Nashik Murder case: नाशिकमधील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगरमध्ये एका चार महिन्यांच्या चिमुकलीची घरात घुसून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला आणि एक धक्कादायक माहिती समोर आली. चिमुकलीच्या आईनेच गळा कापून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. याचं कारणही महिलेनं पोलिसांना सांगितलं. (mother killed her own daughter in nashik)
नाशिक शहरातील गंगापूर रोडवर ध्रुव नगर आहे. या परिसरात ध्रुवांशी भूषण रोकडे (वय 4 महिने) या चिमुकलीची हत्या करण्यात आली. गंगापूर सातपूर लिंक रोडवरील धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे आपली पत्नी,आईसोबत राहतात. त्यांना तीन महिन्यांची मुलगी होती, जिची हत्या झाली. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत.
हे वाचलं का?
अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं
नाशिक हत्या प्रकरण : पोलिसांनी तपास केला अन् सत्य आलं समोर
आरोपी महिलेने सुरूवातीला पोलिसांना वेगळीच माहिती दिली होती. सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार, भूषण हे सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामाला गेले, तेव्हा घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या. सायंकाळी भूषण रोकडे यांची आई दूध घेण्यासाठी घराबाहेर गेली.
ADVERTISEMENT
त्यावेळी घरात भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या. याच दरम्यान पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक घरात शिरली. या महिलेने तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीच्या आणि तिच्या आईच्या नाकाला रूमाल लावला. रुमालाला गुंगीचे औषध लावलेले असल्याने आई बेशुद्ध झाली आणि या महिलेने घरातच पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या चिमुकलीचा धारधार शस्त्राने गळा चिरला, अशी माहिती समोर आली.
ADVERTISEMENT
‘मी शरीर विकून त्यांना कोट्यवधी रुपये कमवून दिले, पण आता मी…’
काही वेळानंतर भूषण यांच्या आई दूध घेऊन घरी आल्या, त्यावेळी त्यांना आपली सून बेशुद्ध अवस्थेत व दुसरीकडे आपल्या तीन महिन्यांची नात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी नाशिकच्या गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चिमुकलीची हत्या का केली? महिलेने सांगितलं कारण
ध्रुवांशी रोकडे या चार महिन्याच्या चिमुकलीची हत्या तिच्याच आईने केल्याच पोलीस तपासात निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलिसांनी महिलेची चौकशी केली. तिने हत्येचं कारणही सांगितलं. बाळ वडिलांसारखे दिसते, असे नातेवाईक सारखे बोलायचे, या कारणामुळे ती (आई) नैराश्यात होती.
सोमवारी (20 मार्च) रात्री सासू आणि दीर घराबाहेर गेल्या असताना आईने झोपलेल्या ध्रुवांशीचा सुरीने गळा कापला. त्यानंतर सुरी धुवून जागेवर ठेवून दिली. त्यानंतर एका महिलेने मला रुमाल लावत बेशुद्ध केले आणि बाळाचा खून केल्याचा बनाव केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आई युक्ता भूषण रोकडेला अटक केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT