‘बायकोला फक्त…’, नवाजुद्दीन सिद्दीकीचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचे (Actor Nawazuddin Siddiqui) खासगी आयुष्य काही दिवसांपासून कठीण टप्प्यातून जात आहे. नवाजुद्दीनची घटस्फोटित पत्नी आलिया हिने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. तसंच नवाजुद्दीनने आपल्याला आणि मुलांना घरातून हाकलून दिले, असाही आरोप आलियाने केला होता. (Actor Nawazuddin Siddiqui has broken his silence after his ex-wife Aaliya Siddiqui levelled several allegations against him.)

ADVERTISEMENT

दरम्यान, या आरोपांवर आता नवाजुद्दीन सिद्दीकीने मौन सोडले आहे. नवाजुद्दीनने सोमवारी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करुन या आरोपांना उत्तर दिलं. त्याने या पोस्टला “हा आरोप नसून मी माझ्या भावना व्यक्त करत आहे.” असं कॅप्शन देत आलियाचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

नवाजुद्दीनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले. माझ्या मौनामुळे मला वाईट व्यक्तीचा टॅग देण्यात आला आहे. पण याचा तमाशा टाळण्यासाठी मी गप्प बसलो होतो, कारण या सगळ्या गोष्टी माझ्या मुलांना आज ना उद्या वाचायला मिळतील. खोट्या आणि एकतर्फी व्हीडियोजच्या माध्यमातून माझं चारित्र्य हनन केलं जातं आहे. ज्याचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, प्रेस आणि अनेक लोक आनंद घेत आहेत. पण काही गोष्टी मला सांगायच्या आहेत.

1. ‘सर्व प्रथम, आलिया आणि मी मागील अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही. आमचा आधीच घटस्फोट झाला आहे. पण आमच्यातील परस्पर समझौता केवळ मुलांसाठी होता.

ADVERTISEMENT

‘2. ‘माझी मुलं भारतात का आहेत आणि गेल्या ४५ दिवसांपासून शाळेत का जात नाहीत हे कोणाला माहीत आहे का? शाळा मला पत्रे पाठवत आहे. पण माझ्या मुलांना 45 दिवसांपासून ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यांना दुबईतील त्यांच्या शाळेत जाता येत नाही.

ADVERTISEMENT

नवाजुद्दीन आलियाला देतो लाखो रुपये :

नवाजुद्दीन सिद्दीकीनेही आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, आलियाला गेल्या 2 वर्षांपासून दरमहा 10 लाख रुपये दिले जात आहेत. सोबतच मुलांसह दुबईला जाण्यापूर्वी आलियाला दरमहा 5-7 लाख रुपये दिले जात होते. मुलांच्या शाळेची फी, मेडिकल आणि प्रवासाचा खर्च वेगळा दिला जातो.

कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी मी आतापर्यंत करोडो रुपये खर्च केले आहेत. आलियाला आलिशान वाहनं देण्यात आली होती, मात्र तिने ती वाहनं विकून तिने पैसे स्वत:साठी खर्च केले. नवाजुद्दीनने सांगितले की, त्याने मुलांसाठी मुंबईत सी-फेसिंग अपार्टमेंटही दिले आहे. मुले लहान असल्याने आलियाला घराची मालकीण करण्यात आली. याशिवाय आपल्या मुलांसाठी दुबईमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केले आहे, जिथे आलिया देखील अत्यंत ऐशोआरामात जीवन जगते, असेही नवाजुद्दीनने सांगितले.

फसवणूक, तीन लग्न; नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियावर गंभीर आरोप

पैशासाठी आलिया बदनाम करत आहे?

नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्नीवर आरोप केला आहे की, ती पैशासाठी हे सर्व करत आहे. नवाजुद्दीनच्या म्हणण्यानुसार, आलिया पैसे हडपण्यासाठी त्याच्यावर अनेक आरोप करत आहे. घरातून बाहेर काढल्याच्या आरोपावर नवाजुद्दीन म्हणाला, जेव्हाही माझी मुलं सुट्टीच्या दिवशी भारतात येतात तेव्हा आजीसोबत राहतात. त्यांना कोणी घरातून कसे बाहेर काढू शकते. घरातून बाहेर काढताना तिने व्हिडिओ का बनवला नाही, तर ती प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवते. याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

‘रोज 3 तास मेकअप, मुलगी झाली नाराज’, नवाजुद्दीन सिद्दीकीनं सांगितलं स्त्री भूमिका करणं किती कठीण

आलियाने नवाजुद्दीनवर काय आरोप केले?

आलिया सिद्दीकीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की, नवाजने तिला तिच्या मुलांसह मध्यरात्री घरातून हाकलून दिले होते. आलियाने सांगितले होते की, तिच्याकडे पैसे नाहीत आणि फिरायला जागा नाही. याशिवाय आलियाने नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले होते, ज्याला आता नवाजुद्दीने उत्तर दिले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT