Rahul Gandhi Speech : ‘तुम्ही देशद्रोही आहात’, राहुल गांधींचं मोदींवर शरसंधान
मणिपूर हिंसाचारावरून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला.
ADVERTISEMENT
Rahul Gandhi on No Confidence Motion : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढवला. मणिपूरमधील हिसाचारावरून काँग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरले.
राहुल गांधी लोकसभा अध्यक्षांना म्हणाले की, “सर्वात आधी मी आपले आभार मानतो. कारण मला पुन्हा लोकसभेचं सदस्यत्व बहाल केले. माझ्या भाजपच्या मित्रांना घाबरण्याची गरज नाही. माझे आजचे भाषण अदाणींवर नाहीये. तुम्ही आरामात रहा. माझे आजचे भाषण दुसऱ्या मुद्द्यांवर आहे. रुमीने म्हटलेले आहे की, जे शब्द ह्रदयातून येतात, ते ह्रदयापर्यत पोहोचतात. आज मी ह्रदयातून बोलत आहे.”
– “मागच्या वर्षी 130 दिवस मी भारतातल्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला गेलो होतो. समुद्र किनाऱ्यापासून ते बर्फाळ डोंगरापर्यंत मी चाललो. या यात्रेदरम्यान मला लोकांनी विचारलं की तू का चालत आहे. काय उद्दिष्ट आहे. सुरुवातीला माझ्याकडे उत्तर नव्हते. ही यात्रा का सुरू केली, हे कदाचित मलाही माहिती नव्हते. मला भारत समजून घ्यायचा होता. लोकांमध्ये जायचं होतं.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
– “ज्या गोष्टीवर माझं प्रेम होतं. ज्या गोष्टीसाठी मृत्यू पत्करायलाही तयार आहे. ज्या गोष्टीसाठी मी मोदींच्या तुरुंगात जायला तयार होतो. मी 10 वर्षे शिव्या खाल्ल्या. ती गोष्ट मला समजून घ्यायची होती.”
– “यात्रा सुरू केल्यानंतर दोन-तीन दिवसात माझ्या गुडघ्यात त्रास सुरू झाला. प्रचंड त्रास होत होता. जेव्हा माझ्यातील भीती वाढत होती. कुठूनतरी कुठली तरी शक्ती माझी मदत करत होती.”
ADVERTISEMENT
– “काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला गेलो होतो. आपले पंतप्रधान नाही गेले. अजूनही गेलेले नाहीत. कारण त्यांना त्यांच्यासाठी मणिपूर भारत नाहीये. मी मणिपूर शब्द म्हटला, पण आजचं सत्य हेच आहे की, मणिपूर राहिलेलं नाही. मणिपूरची तुम्ही दोन भागात विभागणी केली आहे. तोडले आहे.”
ADVERTISEMENT
– “मी मणिपूरमधील छावण्यांमध्ये गेलो. मी महिलांशी बोललो. मी त्या महिलेला विचारलं की, तुमच्यासोबत काय झालं? ती महिला म्हणाली, ‘माझा एकच छोटा मुलगा होता. माझ्या डोळ्यासमोर त्याला गोळी घातली. मी रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ झोपून होते. नंतर मला भीती वाटली. मी माझं घर सोडलं. जे माझ्याजवळ होतं, ते सगळं सोडून दिलं.’ मी त्या महिलेला विचारलं काहीतरी आणलं असेल? त्या महिलेनं सांगितलं, ‘काहीच नाही. माझ्याजवळ फक्त कपडे आहेत.’ तिने इकडे तिकडे शोधलं आणि एक फोटो दाखवला आणि म्हणाली इतकंच माझ्याजवळ राहिलं आहे.”
– “मी दुसऱ्या मदत छावणीत गेलो. मी त्या महिलेला विचारलं की, तुमच्यासोबत काय झालंय? मी प्रश्न विचारताच ती महिला थरथरायला लागली. तिच्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहिले आणि ती बेशुद्ध झाली. हे मी फक्त दोन उदाहरणे दिली आहेत.”
– “अध्यक्ष महोदय, यांनी मणिपूरमध्ये भारताची हत्या केलीये, फक्त मणिपूरची नाही. भारताला मणिपूरमध्ये मारलंय. मणिपूरमध्ये भारताची हत्या केलीये.”
– “मी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणालो की, भारत एक आवाज आहे. त्या आवाजाची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. याचा अर्थ भारत मातेची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारलं. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशभक्त नाही. तुम्ही देशप्रेमी नाही आहात, तुम्ही देशद्रोही आहात.”
– “तुम्ही भारत मातेचे रक्षक नाही आहात, तुम्ही भारत मातेचे हत्यारे आहात. आदराने बोलतोय. भारत माझी आई आहे आणि तुम्ही माझ्या आईची हत्या मणिपूरमध्ये केलीये. माझी एक आई इथे बसलीये, माझ्या दुसऱ्या आईला तुम्ही मणिपूरमध्ये मारलंय. जोपर्यंत तुम्ही हिंसा थांबवणार नाही, तोपर्यंत दररोज तुम्ही माझ्या आईची हत्या करत राहाल. भारताचे सैन्य मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकते. तुम्ही लष्कराचा वापर करत नाही आहात. कारण तुम्हाला भारताला मणिपूरमध्ये मारायचं आहे.”
– “जर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा आवाज ऐकत नसतील, जर भारताच्या मनातील आवाज ऐकत नसतील, तर ते कुणाचा आवाज ऐकतात. ते दोन लोकांचा आवाज ऐकतात. रावण दोन लोकांचं ऐकायचा. मेघनाथ आणि कुंभकर्ण. तसंच नरेंद्र मोदी दोन लोकांचं ऐकतात, अमित शाह आणि अदाणी.”
– “लंका हनुमानाने जाळली नव्हती. लंकेला रावणाच्या अंहकाराने जाळले होते. रामाने रावणाला मारले नव्हते. रावणाच्या अंहकाराने त्याला मारले होते. तुम्ही पूर्ण देशात केरोसीन टाकत आहात. तुम्ही मणिपूरमध्ये केरोसीन टाकली आणि आग लावली. तेच आता हरयाणात करत आहात. पूर्ण देश जाळायला तुम्ही निघाला आहात.”
ADVERTISEMENT