कोरोनाची दुसरी लाट येण्याआधीच ICU बेडस ते ऑक्सिजनचे प्लांट उभारणारा IAS अधिकारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नंदूरबार: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने अक्षरश: मृत्यूचं थैमान घातलं आहे. देशात दररोज हजारो कोरोना रुग्ण हे आपले प्राण गमावत आहेत. अशावेळी सरकारच्या तयारीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. पण अशावेळी महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील एका आयएएस अधिकाऱ्याने दूरदृष्टीने जी तयारी केली होती त्याचं आता बरंच कौतुक होत आहे.

ADVERTISEMENT

नंदूबार (Nandurbar) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड (IAS Dr. Rajendra Bharud) यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याआधीच जी तयारी केली होती ती नक्कीच वाखणण्याजोगी आहे. त्यांनी मागील वर्षी आलेल्या कोरोना लाटेचा अवघ्या काही बेड्सच्या जोरावर जिल्ह्यातील कोव्हिडची लढाई लढली होती. पण जेव्हा रुग्णसंख्या कमी झाली त्यानंतर त्यांनी भविष्यात येणाऱ्या संकटाच्या दृष्टीने पावलं टाकत तशी तयारी केली.

जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नाने आता तिथे रुग्णालयात 1289 बेड्स उपलब्ध आहेत तर 1117 बेड्स कोव्हिड केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयात 5620 बेड्स उपलब्ध आहेत. याच जोरावर ते कोरोनाशी मजबुतीने लढा देत आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनी शाळा, सोसायटी आणि मंदिरांमध्ये देखील बेड्स उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे तिथे 7 हजारांहून अधिक आयसोलेशन बेड्स आणि 1300 आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत.

हे वाचलं का?

‘या’ 5 वेबसाइट्स कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजन, बेड्स, औषध मिळवून देण्यात करतील मोठी मदत

नंदूरबार जिल्ह्यात आज स्वत: ऑक्सिजन तयार करण्यात पुढे आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यापासून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. एवढंच नव्हे तर संपूर्ण राज्याने त्यांचं मॉडेल स्वीकारलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

डॉ. राजेंद्र भारुड हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुंबईच्या KEM रुग्णालयातून त्यांनी आपलं MBBS चं शिक्षण पूर्ण केलं होतं. दरम्यान, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या जेव्हा खाली येऊ लागली होती तेव्हा जवळजवळ सगळेच निर्धास्त झाले होते. पण याचवेळी राजेंद्र भारूड यांना कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शंका होती त्यामुळे त्यांनी डिसेंबर महिन्यापासूनच आपल्या जिल्ह्यासाठी तयारी सुरु केली होती.

ADVERTISEMENT

मोठी बातमी, ‘सिरम’ने सांगितलं महाराष्ट्राला लस कधी मिळणार!

जिल्ह्यात मागील वर्षी साधारण दररोज 190 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. पण आता रुग्णांची संख्या ही दररोज 1200 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, त्यांनी आधीच जिल्हा विकास निधीतून तिथे 3 ऑक्सिजन प्लांट तयार केले होते. जिथे 3 हजार लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन तयार होतो. तसंच मागील 3 महिन्यात इथे 27 रुग्णवाहिका देखील खरेदी करण्यात आल्या होत्या.

पाहा काय आहे नंदूरबार पॅटर्न:

वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सद्यःस्थितीत ऑक्सिजनची वानवा आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळणे दुरापास्त होत असताना नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दूरदृष्टी ठेवत तोकडी आरोग्य यंत्रणा असताना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दोन व शहाद्यातील कोविड केअर सेंटरलगत एक असे तीन हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले आहेत.

जिल्‍हा स्‍वयंपूर्ण या प्रकल्‍पांमुळे सद्यःस्थितीत जिल्ह्यातील रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी 50 टक्के निकड यातून भागत आहे. तर येत्या काही दिवसांत नवापूर व तळोदा येथे ऑक्सिजन प्रकल्प प्रस्तावित असून जिल्हा रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन जम्बो प्रकल्पाच्या निर्मितीला सुरवात झाल्याने मे महिन्यात जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील हवेतील ऑक्सिजन प्रकल्प राज्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे.

ऑक्सिजन नर्स

ऑक्सिजनवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय सार्वजनिक रुग्णालयात स्वतंत्र एक नर्स नियुक्त करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. अनेकवेळा रुग्णांना बाथरूमसाठी बाहेर जावे लागते यावेळेस पुन्हा येताना त्यांची ऑक्सिजन प्रमाण कमी-अधिक प्रमाणात आहे का याबाबत विशेष लक्ष या ऑक्सिजन नर्सेस ठेवत असतात.

खरं तर डॉ. राजेंद्र भारुड हे देखील स्वत: एका आदिवासी कुटुंबात जन्माला आले होते. त्यांच्या जन्माच्या काही दिवस आधीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांना कधीच पाहिलं नव्हतं. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपलं सुरुवातीचे दिवस काढले. यावेळी त्यांच्या आईने अत्यंत काबाडकष्ट करुन त्यांना चांगलं शिक्षण दिलं. ज्यामुळे आज डॉ. राजेंद्र भारुड हे एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT