Rajya Sabha Election 2022 : धनंजय महाडिक कोण आहेत?, भाजपने त्यांनाच उमेदवारी का दिलीये?
–दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यामुळे कोल्हापुरच्या राजकारणात दबदबा असलेल्या धनंजय महाडिकांबद्दल आणि त्यांना उमेदवारी देण्याबद्दल आता चर्चा होतेय, तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल… धनंजय महाडिक यांनी आतापर्यंत 2004, 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणूक लढवल्या आहेत. 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून […]
ADVERTISEMENT
–दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर
ADVERTISEMENT
माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यामुळे कोल्हापुरच्या राजकारणात दबदबा असलेल्या धनंजय महाडिकांबद्दल आणि त्यांना उमेदवारी देण्याबद्दल आता चर्चा होतेय, तर जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल…
धनंजय महाडिक यांनी आतापर्यंत 2004, 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणूक लढवल्या आहेत. 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. २००४ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. २००९ मध्ये त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट दिलं गेलं नाही.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
२००९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने सदाशिवराव मंडलिक यांना वगळून संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली होती आणि धनंजय महाडिकांना थांबायला सांगितलं होतं. तर या निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय महाडिक यांनी दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
ADVERTISEMENT
त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना रिंगणात उतरवण्यात आलं आणि धनंजय महाडिक पहिल्यांदा खासदार झाले. 2019 मध्येही त्यांनी निवडणूक लढवली. शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला.
ADVERTISEMENT
पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व राखण्यासाठी धनंजय महाडिक यांना राज्यसभेच्या उमेदवारी दिली असल्याचे बोललं जात आहे. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये धनंजय महाडिक व सतेज पाटील या दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष सातत्यानं दिसतो.
कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती. आता येणाऱ्या काळात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अस्तित्व राखण्यासाठी व सत्ता मिळविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपकडून एक प्रकारे महाडिकांना बळ देण्याचा प्रयत्न होतोय, असं सांगितलं जातं.
कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेंद्र यड्रावकर हे तीन मंत्री आहेत. त्या तुलनेत भाजपकडून या ठिकाणी राज्यसभेच्या रूपाने खासदार मिळवण्यासाठी प्रयत्न होत केला जात आहे.
या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असून, शिवसेना विरुद्ध भाजप असा जरी संघर्ष पाहायला मिळत असला तरी यामध्ये कोण बाजी मारणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
महाडिकांना उमेदवारी का?
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण सहकारावर आधारलेलं आहे. सध्या या जिल्ह्यात भाजपचं कोणतंही अस्तित्व सध्यातरी दिसत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचेच, पण 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवली.
याच निवडणुकीत कोल्हापुर जिल्ह्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. त्यानंतर कोल्हापूरच्या नुकत्याच झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महा विकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या निवडणुकीतही महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला.
त्यामुळे आता होत असलेल्या राज्यसभा या निवडणुकीत भाजपने माजी खासदार धनंजय महाडिकांना यांना उमेदवारी देऊन पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT