सावरकरांना दाढी मान्य नव्हती, डॉ.मिंधे गुळगुळीत फिरणार का? संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut criticize CM Eknath Shinde And Devendra Fadnavis : दाढी वाढवण सावरकरांना मान्य नव्हतं, शिंदे दाढी कापणार का? डॉ.मिंधे गुळगुळीत दाढी करून यात्रेत फिरणार आहेत का? अशी टीका देखील राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
ADVERTISEMENT
Sanjay Raut criticize CM Eknath Shinde And Devendra Fadnavis : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज 2 एप्रिलला छत्रपती संभाजनगर येथे महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे.या सभेपुर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सावरकरांनी देशाला दिशा दिलीय, वैज्ञानिक दृष्टीकोन दिलाय. हा वैज्ञानिक दृष्टीकोन जर भाजपा आणि मिंधे गट पाळणार असेल तर त्यांचे स्वागत असे संजय राऊत म्हणाले आहेत. राऊत पत्रकारांशी बोलत होते. (sanjay Raut criticize cm eknath shinde and devendra fadnavis on savarkar gaurav yatra)
ADVERTISEMENT
गाईचे गोमास खायला हरकत नाही…
सावरकरांनी हिदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याचा महत्वाचा संदर्भ दिला होता. असे म्हणतं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, भाजप असं म्हणतंय कि गाय ही गो माता आहे. सावरकरांना ते मान्य नव्हतं. गाय हा उपयुक्त पशू आहे, जर ती गाय दुध देण्याची थांबली तर मग त्या गाईचे गोमास खायला हरकत नाही, हा सावरकरांचा विचार होता. भाजपाला हा विचार मान्य आहे का? असा सवाल उपस्थित केला.
शिंदे दाढी कापणार का?
शेंडी जाणव्यांचं हिंदुत्व, तसेच दाढी वाढवण सावरकरांना मान्य नव्हतं, शिंदे दाढी कापणार का?असा सवाल राऊत यांनी केला. यासह दाढी वाढवण आपल्या धर्मात बसत नाही, कोणी वाढवू नये,डॉ.मिंधे गुळगुळीत दाढी करून यात्रेत फिरणार आहेत का? अशी टीका देखील राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.
भाजप-शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेवर बोलताना संजय राऊत यांनी शिंदे आणि फडणवीसांना सुनावले आहे. तुम्ही सावरकर साहित्य वाचलंय का? आधी सावरकर साहित्याचं पारायण करावं, बसाव, साहित्या वाचाव, असा सल्ला त्यांनी सत्ताधारी पक्षाला दिला.
संजय राऊत (Sanjay Raut)यांना लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीच्या नावाने जीवे मारण्याच्या धमकी आली होती.या धमकीवरून सुरक्षेबाबतचा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावर हे सरकार जीवाच्या बाबतीत अत्यंत बेफीकिर आहे, आणि असायलाही हरकत नाही. कारण या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करणे म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखं आहे अशी टीका देखील राऊत यांनी केली.
ADVERTISEMENT
दरम्यान संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेचा प्रचंड गर्दी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या सभेची मोठी तयारी सूरू असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT