‘…मुसेवाला टाइप करुन टाकेन’, संजय राऊतांना लॉरेन्स टोळीकडून जीवे मारण्याची धमकी
Sanjay Raut Death Threat: शिवसेना (UBT)पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत अज्ञात नंबरवरून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
Sanjay Raut: मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanajy Raut) यांना लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या धमकीनंतर राऊत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेसेज करून ‘मी तुझाही मुसेवाला करून टाकेन’, असं म्हटलं आहे. मेसेजमध्ये राऊत यांना हिंदूविरोधी म्हणत शिवीगाळही करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी काल रात्री एका संशयिताला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (shiv sena ubt party mp sanjay raut death threat from lawrence gang)
ADVERTISEMENT
लॉरेन्सच्या नावाने धमकी
लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने मिळालेल्या या धमकीमध्ये म्हटले आहे की, ‘जर तुम्ही दिल्लीत सापडलात, तर तुम्हाला एके 47 ने उडवले जाईल, मूसेवाला करून टाकू.’ या धमकीनंतर राऊत यांनी पत्र लिहून पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा- ‘लोकांनी धर्माच्या भांगेच्या नशेत मतदान करावे हे कारस्थान’, भाजपवर जहरी टीका
गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हा ही धमकी कन्नड रक्षण वेदिका नावाच्या संस्थेकडून आल्याचा दावा त्यांनी केला होता.
सलमान खानलाही धमकी
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानला लॉरेन्स टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. याआधीही सलमानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्या होत्या आणि त्याने त्याच्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती. गेल्या आठवड्यात लखनऊच्या प्रसिद्ध दागिन्यांच्या दुकान खुन खुन जी ज्वेलर्सचा मालक उत्कर्ष अग्रवाल यांच्याकडे गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाने खंडणी मागण्यात आली होती. त्यांच्या नंबरवर व्हॉट्सअॅप कॉल आला होता त्यावेळी कॉलरने 30 लाख रुपयांची मागणी केली होती.
अधिक वाचा- sanjay Raut : राऊतांची खासदारकी धोक्यात? प्रकरण उपराष्ट्रपतींच्या कोर्टात
कोण आहेत संजय राऊत?
संजय राऊत हे आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले राऊत हे 80 च्या दशकात मुंबईत क्राइम रिपोर्टिंग करायचे. लोकप्रभा मासिकातून कारकिर्दीची सुरुवात करणारे राऊत हे अंडरवर्ल्ड रिपोर्टिंगमध्ये तज्ज्ञ मानले जायचे. दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अंडरवर्ल्डवरील त्याच्या रिपोर्ट्सची मुंबईत मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायची. रिपोर्टिंगच्या जगात राऊत यांचे नाव वाढले आणि ते बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेसमोर आले. राऊत यांच्या ‘मातोश्री’वरील भेटी वाढल्या आणि शिवसेनाप्रमुखांनी अवघ्या 29 वर्षांच्या राऊत यांना शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’चे कार्यकारी संपादक केले. यानंतर ते शिवसेनेचे प्रवक्ते झाले आणि नंतर राज्यसभेत पोहोचले.
ADVERTISEMENT
अधिक वाचा- उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस ठरवून एकत्र आले? ठाकरेंना टोला लगावत राऊतांनी दिलं उत्तर
2019 साली राज्यात जे नाट्यमयरित्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यातील संजय राऊत हे महत्त्वाचे सूत्रधार मानले जातात. तेव्हापासून पक्षात त्यांचं बरंच वजन वाढलं होतं. मात्र, नुकतंच झालेल्या बंडाळीला देखील राऊतच जबाबदार असल्याचा आरोप अनेकांनी त्यांच्यावर केला आहे. मात्र, असं असलं तरीही राऊतांनी आपण कायम उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT