‘शिंदेंना मुख्यमंत्री करायचं ठरलेलं, फडणवीसांना माहितीही नव्हतं’, कोणी केला गौप्यस्फोट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

It was decided long ago that Eknath Shinde should be made Chief Minister. About which Devendra Fadnavis did not even know. This claim has been made by an MLA of the Thackeray group.
It was decided long ago that Eknath Shinde should be made Chief Minister. About which Devendra Fadnavis did not even know. This claim has been made by an MLA of the Thackeray group.
social share
google news

Political news in Maharashtra: मुंबई: ‘महाविकास आघाडीचं सरकार (MVA Govt) पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच मुख्यमंत्री (Chief Minister) करायचं हे आधीच ठरलं होतं.’ असा धक्कादायक खुलासा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला आहे. शिवसेनेची (Shiv Sena) कहाणी सांगणारा ‘आवाज कुणाचा’ हा पॉडकास्टचा कार्यक्रम ठाकरे गटाकडून (Thackeray Group) सुरु करण्यात आला आहे. यात शिंदेंच्या बंडाच्यावेळी शिंदेंच्या आमदारांच्या तावडीतून पळून आलेले नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांची मुलाखत घेण्यात आली. (shiv sena ubt podcast eknath shinde cm bjp devendra fadnavis no idea thackeray group mla nitin deshmukh political news in maharashtra)

ADVERTISEMENT

या मुलाखतीमध्ये दोघांनी अनेक खुलासे केले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सहा ते सात महिन्यांमध्येच हे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु झाले होते असं देशमुख यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसेनेत फुट पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाही तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचे अमित शाह आणि एकनाथ शिंदे याचं ठरलं होतं असं देशमुख यांनी सांगितले. त्याचबरोबर याबाबत फडणवीस यांना देखील माहिती नव्हती असं देखील देशमुख यावेळी म्हणाले.

हे ही वाचा >> देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं का?: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिरातीमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीनंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. आता पुन्हा देशमुख यांनी खुलासा केल्याने याच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे वाचलं का?

“उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असू शकतात”

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांना याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डिवचलं होतं.

ADVERTISEMENT

29 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 30 जूनला राज्यात नवं सरकारही आलं. दुपारी 3 वाजेपर्यंत हीच चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Shinde यांचा CM होण्याचा मार्ग कसा झालेला मोकळा?, ‘ही’ आहे जूनमधली क्रोनोलॉजी

देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केल्यानंतर तसंच नंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव उपमुख्यमंत्री म्हणून समोर आलं. तसंच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शपथही घेतली. यानंतर शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती.

तेव्हा पवार म्हणाले होते की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने ते नाराज असतील हे वाटत होतं. कारण त्यादिवशी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ असू शकतात असं ऐकण्यात आलं आहे. मात्र त्यांच्या पक्षात आदेश पाळण्याची परंपरा आहे. ती परंपरा त्यांनी पाळली.’

‘देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण केलं जातंय हे काही मी मानणार नाही. कारण त्यांच्या पक्षाने हा निर्णय घेतला. देवेंद्र यांनी तो निर्णय पाळला. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा सन्मान राखला, त्यामुळे मला त्यात काही चुकीचं वाटत नाही, असं शरद पवार यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT