‘देवेंद्रजी तुमच्या परिवाराचेही WhatsApp चॅट…’, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी डिवचलं
पाटण्याचा बैठकीवरुन उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरेंनी देखील आता पलटवार केला आहे. तसंच त्यांच्या कुटुंबाच्या WhatsApp चॅटचा देखील त्यांनी यावेळी उच्चार केला. जाणून घ्या ठाकरे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
Political News of Maharashtra: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाच्या मुंबईतील विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखाची एक विशेष बैठक ही आज (24 जून) दादरमधील (Dadar) शिवाजी मंदिरात आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) चौफेर फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कुटुंबावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे हे काल (23 जून) पाटण्याला विरोधकांच्या बैठकीला गेले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टिकेला उत्तर देताना ठाकरेंनी थेट फडणवसींना सुनावलं म्हटलं की, ‘आमच्या कुटुंबावर बोलाल तर तुम्हाला देखील परिवार आहे… परिवाराचे सुद्धा व्हॉट्सअॅप बाहेर येत.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. (shiv sena ubt uddhav thackeray criticized devendra fadnavis whatsapp chat amruta fadnavis yoga day family political news of maharashtra)
ADVERTISEMENT
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्यानंतर एक नवी चर्चा सुरू झाली आहे की, त्यांच्या हाती नेमकी कोणती माहिती लागली आहे? की, ज्यावरून त्यांनी फडणवीसांना उघडपणे आव्हान दिलं आहे.
पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय-काय म्हणाले:
‘येता 1 जुलैला आपण महापालिकेवर आपण मोर्चा लावला आहे. आपण जो मोर्चा काढतो आहोत त्यामध्ये थोडासा फरक आहे. जो काही बोभाटा चाललाय.. कोरोना काळातला घोटाळा.. त्या सूरजच्यावर धाड टाकली. साधा शिवसैनिक आहे. काल आपले उपमुख्यमंत्री.. मी तुम्हाला सगळ्यांना सांगून पाटण्याला गेलो होतो. पण लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत.’
हे वाचलं का?
‘देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका.. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या सुद्धा परिवाराचे व्हॉट्सअॅप बाहेर येत आहेत. आलेले आहेत. आम्ही अजून त्यावर बोललेलो नाहीत. मग जर तुमच्या परिवारावर बोलावं लागलं तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल. वेगळी कोणतीही आसनं तुम्हाला झेपणार नाहीत. नुसतं शवासन.. पडून राहावा लागेल.. योगा डे.. त्यामुळे परिवारावर बोलू नका. कारण मी माझ्या परिवाराबद्दल संवेदनशील आहेच. हा माझा परिवार आहे आणि सूरजसुद्धा माझ्या परिवारातील आहे.’
‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी.. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरं कोणी घेत असेल तर ते तुमचं तुम्हाला माहीत. पण माझं कुटुंब मी जपणार.. आणि माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. त्यामुळे परिवार बचाव वैगरे बोलू नका.. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे सुद्धा आहेत.’
हे ही वाचा >> Pune MPSC: दर्शना पवारची राहुलने केली दगडाने ठेचून हत्या?, धक्कादायक माहिती समोर
‘आपला जो काही देश चालला आहे तो फक्त आणि फक्त देशावरील संस्कारामुळे आणि देशवासियांच्या संयमामुळे चालला आहे. भाजपच्या हातून देश कशीच सुटला आहे. कारभार म्हणून शून्य.’
ADVERTISEMENT
‘म्हणून आता उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे हा एवढा खलनायक करता आहात. जनता ठरवेल मी नायक आहे खलनायक. पण एक नक्की की, तुम्ही नालायक आहे. हे जनतेला पक्कं माहिती आहे.’
हे ही वाचा >> Monsoon: मुंबईकर चिंब भिजले… पावसाच्या जोरदार सरी, कोकणातही मुसळधार पाऊस!
‘कोरोना काळात लोकांचा जीव वाचविण्यासाठी प्राथमिकता आपण दिली. चौकशीच करायची असेल तर ठाणे पालिकेची करा. जो संजय केळकर जो तुमच्याच.. आता त्याला किंमत नसेल कदाचित.. कारण देवेंद्रलाच जिकडे किंमत नाही. तिकडे केळकरला विचारतंय कोण? मग पीएम केअर फंडची चौकशी करा. अरे ज्या सरकाराच जन्मच खोक्यातून झालाय ते काय आमची चौकशी करणार?’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT