नागपुरमध्ये कुटुंब संपवण्यासाठी टोकाचं पाऊल! कारच दिली पेटवून, पत्नी आणि मुलगा होरपळले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

नागपूरच्या एका व्यावसायिकाने चालत्या गाडीत आग लावून मुलगा आणि पत्नीसोबतआत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला असूनत्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर रुग्ण्यालयात उपचार सुरुआहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून असा पाऊल उचलला गेल्याची आता माहिती समोर येतआहे. मात्र, आत्महत्येसाठी उचलण्यात आलेला पाऊल हा गंभीर असल्याने नागपूर शहरातया घटनेची चर्चा मोठ्याप्रमाणात सुरु आहे. 65 वर्षीय मृत व्यावसायिकाचं रामराज भट्टअसं नाव होतं तर पत्नीचं संगीता आणि मुलाचं नंदन असं नाव आहे.

नागपूरचे व्यावसायिक रामराज भट्ट यांनी नेमकं काय केलं?

मंगळवारी रामराजने पत्नी आणि मुलाला हॉटेलमध्ये जेवणासाठी जाऊ म्हणून तयार केलं. वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलं. जेवण करून आपल्या कारमध्ये परततहोते. जवळपास दुपारी एकच्या सुमारास गाडी खापरी पुनर्वसन केंद्राजवळ थांबवली. अचानक रामराज यांनी आपल्या जवळील असलेलं ज्वलनशील पदार्थ कारमध्ये शिंपडलं. आपल्यासह पत्नी आणि मुलाच्या अंगावर देखील शिंपडलं. दोघांना काही कळायच्या आतकार पेटवून दिली.

हे वाचलं का?

नागपुरातील संतापजनक घटना! पोलीस उपनिरीक्षकाचा अल्पवयीन मुलींवर बलात्कार

अचानक लागलेल्या आगीमुळे पत्नी आणि मुलाने जळालेल्या अवस्थेत कारबाहेर पळकाढला. रस्त्यावर पावसामुळे साचलेल्या पाण्यात लोळून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले तर रामराज यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. संगीता आणि नंदन यांना घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी रुग्णालयात नेलं. दोघेहीगंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ADVERTISEMENT

नागपूर: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेलेल्या तरुणाचा मृतदेहच सापडला; रूममध्ये काय घडलं?

ADVERTISEMENT

रामराज यांचा नट-बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. विविध कंपन्यांना ते माल पुरवठाकरायचे. कोरोनाच्या कारणामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या व्यवसायाला मोठाफटका बसला होता. म्हणून रामराज यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. याच आर्थिक कोंडीतून त्यांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचीमाहिती आता समोर येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT