Kharghar Road Rage : गाडीचा धक्का लागला म्हणून वाद झाला, डोक्यात हेल्मेट मारल्यानं एकाचा मृत्यू
नवी मुंबईतील उत्सव चौकात मागून येणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हाणामारी झाली. दुचाकीस्वाराने चालकाच्या डोक्यावर हेल्मेट मारून त्याला मारहाण केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रस्त्यावर झालेला लहानसा वाद वाढला, हाणामारी झाली

नवी मुंबईत दोन चालकांच्या वादात एकाचा मृत्यू

डोक्यात हेल्मेट लागल्यानं एका व्यक्तिचा मृत्यू
नवी मुंबई : खारघरमधील उत्सव चौक परिसरात किरकोळ वादातून झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावरुन प्रवास करताना होणाऱ्या लहान लहान गोष्टींमुळे होणारे अनेक वाद आपण पाहत असतो. तसाच वाद खारघरमधील उत्सव चौकात वाहनचालकांमध्ये झाला होता. त्यावेळी रागारागात दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीस्वाराला थेट हेल्मेटने मारलं होतं.
हे ही वाचा >> Maharashtra Elections : संध्याकाळी 6 नंतर झालेल्या मतदानाचा मुद्दा, निवडणूक आयोगाला नोटीस
प्राथमिक माहितीनुसार, उत्सव चौकात मागून येणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हाणामारी झाली. दुचाकीस्वाराने चालकाच्या डोक्यावर हेल्मेट मारून त्याला मारहाण केली. घटनेनंतर जखमी इसम खारघर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला, परंतु तिथेच त्याचा मृत्यू झाला.
मृताचं नाव शिवकुमार शर्मा...
हे ही वाचा >> Ashok Dhodi Case : शिवसेना नेते अशोक धोडी हत्या प्रकरणात वापरलेली कार राजस्थानात सापडली
खारघर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.