Sangli : वन अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या 63 जणांना विषबाधा, 8 जण गंभीर, कशी झाली विषबाधा?
वनप्रशिक्षण केंद्र, चिखलदरा (अमरावती) येथील 110 प्रशिक्षणार्थी व सहाय्यक व इतर अधिकारी 8 असे 118 जण कुंडल येथील वन अॕकेडमीला भेट देण्यासाठी सोमवार संध्याकाळी आले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ओझरमधून निघताना घेतलं होतं जेवणाचं पार्सल

कुंडलमध्ये आल्यानंतरही केलं होतं जेवण

प्रशिक्षणार्थी व सहाय्यक राधानगरीला जाणार होते
Sangli : सांगलीतमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कुंडल वन अकादमीमध्ये 63 जणांना विषबाधा झाली असून, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सूरू आहे. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्र, पलूस ग्रामीण रुग्णालय व सांगलीच्या शासकीय रुग्णालयात या सर्वांवर उपचार सुरू आहेत.
वनविभागाच्या प्रशिक्षण केंद्रात सुमारे 63 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय आहे. वनप्रशिक्षण केंद्र, चिखलदरा ( अमरावती) येथील 110 प्रशिक्षणार्थी व सहाय्यक व इतर अधिकारी 8 असे 118 जण कुंडल येथील वन अॕकेडमीला भेट देण्यासाठी सोमवार दि. 24 रोजी संध्याकाळी आले होते.
हे ही वाचा >> Raju Patil : गंगेत कधीही डुबकी मारली तर पाप धुतलं जाईल, पण इथं पुण्य जास्त मिळेल, एकनाथ शिंदेंवर मनसेचा थेट निशाणा
त्यापूर्वी 17 फेब्रुवारीपासून संभाजीनगर, जुन्नर, ओझर, बनेश्वर येथील वनउद्यान, इकोबटालीयन प्लांटेशन, रोपवाटीका, बिबट्या उपचार केंद्र व तत्सम ठिकाणी भेट देऊन बनेश्वर (ओझर) येथून सोमवारी सकाळी निघाले होते. निघताना दुपारच्या जेवणाचं पार्सल बरोबर घेतलं होतं ते सर्वांनी दुपारी रस्त्यामध्ये खाल्लं. त्यानंतर ते संध्याकाळी कुंडलमध्ये आले.तिथून पुढे राधानगरी येथे जाणार होते.
दरम्यान, रात्री कुंडल वनप्रभोधिनी मध्ये स्थानिक प्रशिक्षणार्थी व अमरावतीहुन आलेले प्रशिक्षणार्थी या सर्वांनीच शाकाहारी व मांसाहारी जेवण केलं होतं. एकूण जवळपास पाचशे जणांनी जेवण केलं. मात्र त्यापैकी फक्त अमरावतीहुन आलेल्याच प्रशिक्षणार्थीं पैकी काहींना पहाटे जुलाब, व उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यांना तात्काळ कुंडल येथील आरोग्य केंद्रात दाखल केलं.
हे ही वाचा >>Sharad Pawar: "नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य मूर्खपणाचं...", पत्रकार परिषदेत शरद पवार नेमकं काय म्हणाले?
वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पाटील व त्यांच्या पथकाने तात्काळ बाधित रुग्णांवर उपचार सुरु केले. गंभीर असलेल्या 8 जणांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर 21 जणांना पलूस ग्रामीण रुग्णालयात आणि कुंडल आरोग्य केंद्रात 39 जण वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणाखाली उपचार घेत आहेत.