Abhishek Verma : व्यावसायिक अभिषेक वर्मा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत; हेलिकॉप्टर घोटाळ्यात...

मुंबई तक

अभिषेक वर्मा यांच्याशी संबंधीत या प्रकरणांची चौकशी सीबीआय आणि ईडीने केली होती. त्यापैकी एका प्रकरणात वर्मा यांच्या पत्नी अनका वर्मा देखील आरोपी होत्या. पण त्यांनाही सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

व्यावसायिक आणि शस्त्रास्त्रांचे व्यापारी अभिषेक वर्मा शिवसेनेत

point

एकनाथ शिंदेंच्या उपस्थित झाला प्रवेश

एकीकडे राज्यातील काही माजी आमदारांना गळाला लावण्यासाठी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुंबईत एक प्रवेश चर्चेचं कारण ठरला. मुंबईमध्ये व्यावसायिक आणि शस्त्रास्त्र डीलर अभिषेक वर्मा यांनी गुरुवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. गुरुवारी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

हे ही वाचा >> Namdeo Shastri : धनंजय मुंडे यांच्यावर मीडिया ट्रायल, भगवानगड त्यांच्या पाठीशी : महंत नामदेव शास्त्री

अभिषेक वर्मा यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक पद देण्यात आल्याची माहिती देखील सुत्रांकडून समोर आली आहे. त्यांच्यावर यापूर्वी हेलिकॉप्टर घोटाळा आणि पाणबुडी खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणांमध्ये लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप होते, पण 2015 आणि 2017 मध्ये न्यायालयाने त्यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केलं.

हे ही वाचा >> Sanjay Raut : ठाकरे-भाजप एकत्र येऊ शकतात? चंद्रकांत पाटील यांचं नाव घेऊन काय म्हणाले राऊत...

दरम्यान, या प्रकरणांची चौकशी सीबीआय आणि ईडीने केली होती. त्यापैकी एका प्रकरणात वर्मा यांच्या पत्नी अनका वर्मा देखील आरोपी होत्या. पण त्यांनाही सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिषेक वर्मा शिवसेनेत सामील झाले, तेव्हा अनका वर्मा देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp