Ajit Pawar meets Sharad Pawar : मुंबईत शिंदे विरूद्ध ठाकरे दंड थोपटत असताना पुण्यात दोन्ही पवारांची बंद दाराआड चर्चा

मुंबई तक

सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीचे हे घटक मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचे आम्हीच खरे वारसदार असल्याचं सांगण्यासाठी ताकद लावत असतानाच, पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड बैठक झाली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात शरद पवार-अजित पवारांची बंद दाराआड चर्चा

point

शरद पवार-अजित पवारांमध्ये काय चर्चा?

Ajit Pawar Sharad Pawar Meeting : बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त, ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबईत आपली ताकद दाखवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले. सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीचे हे घटक मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचे आम्हीच खरे वारसदार असल्याचं सांगण्यासाठी ताकद लावत असतानाच, पुण्यात काही तरी वेगळं घडत होतं. मविआमध्ये असलेले शरद पवार आणि महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे दोन्ही नेते एकत्र होते. गुरुवारी या दोन्ही नेत्यांची पुण्यात भेट झाली.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड बैठक झाली. वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अजित पवारांच्या आईनेही अलीकडेच दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली होती. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड झालेल्या बैठकीबद्दल बोलताना सांगितलं की, साखर उद्योगाशी संबंधित मुद्द्यांवर आमची चर्चा झाली. साखर उद्योगाशी संबंधित असलेल्या कृषी, उत्पादन शुल्क, सहकार आणि ऊर्जा विभागांचे प्रतिनिधी देखील या बैठकीत उपस्थित होते असं अजित पवार म्हणाले. 

हे ही वाचा >> Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदे प्रकरणी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल होणार? वकील काय म्हणाले?

शरद पवार यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, अजित पवारांसोबत प्रकल्पाबद्दल चर्चा केली. राष्ट्रवादीबद्दल अजिबात चर्चा नाही झाली, नव्या सहकारमंत्र्यांना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून माझ्याशी बोलायचं होतं, त्यामुळे ते माझ्या शेजारी बसले होते असं शरद पवार म्हणालेत. 

दरम्यान, या बैठकीवर भाजपचीही प्रतिक्रिया आली आहे. भाजप अध्यक्ष आणि राज्य सरकारचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या चर्चेचं स्वरूप राजकीय होतं की नाही हे आम्हाला माहित नाही. जर ही राजकीय चर्चा असती तर अजितदादांनी महायुतीमध्येही याबद्दल बोलायला हवं होतं, असंही ते म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्षांनी असेही म्हटलं की जर ही वैयक्तिक भेट असेल तर ती पूर्णपणे कौटुंबिक बाब होती. 

हे ही वाचा >> Ulhasnagar Crime News : शेजारी राहणाऱ्या बाप-बेट्यांकडून चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दरम्यान, शरद पवार हे व्हीएसआयचे अध्यक्ष आहेत तर अजित पवार हे त्याचे विश्वस्त आहेत. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर काका-पुतणे दोघेही एकत्र सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp