Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय 14 वर्ष होणार? अजित पवार म्हणाले याच अधिवेशनात अमित शाह...
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोयत्यानं होणाऱ्या हल्ल्यांमध्येअनेकदा अल्पवयीन मुलं सामील असतात. त्यांच्यावर कडक कारवाई करता येत नाही. या संदर्भात, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अजित पवार अल्पवयीन आरोपींच्या वयाबद्दल काय म्हणाले?

कोयत्याच्या प्रकरणांमुळे कायद्यात केंद्राकडून बदल होणार?

आरोपींच्या वयाबद्दल नेमकं काय म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar Pune : गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता सहभाग लक्षात घेता, गुन्हेगारांचं वय 18 वर्षांवरून 14 वर्ष करण्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. यासाठीच नवीन कायदा करण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
बारामती तालुक्यातील पंदरे गावात एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. अजित पवार म्हणाले, 'बऱ्याच ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून गंभीर गुन्हे घडत आहेत.' पुणे आणि बारामतीसारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येचाही अजित पवार यांनी उल्लेख केलाय. तसंच मुलांकडून होणाऱ्या हत्या, खुनी हल्ले आणि दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात होणारे हल्ले, यावर कठोर उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
हे ही वाचा >> Thane Crime News : 55 वर्षीय कामगाराकडून 9 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, 7 महिन्यानंतर कारवाई, प्रकरण काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोयत्यानं होणाऱ्या हल्ल्यांमध्येअनेकदा अल्पवयीन मुलं सामील असतात. त्यांच्यावर कडक कारवाई करता येत नाही. या संदर्भात, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की, अलिकडे काही लोक 13 ते 14 वर्षांच्या मुलांना चुकीच्या पद्धतीनं भडकवून त्यांना चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही. तुरुंगात टाकता येत नाही. त्यांना सुधारगृहात पाठवावं लागतं. तिथे त्यांना कठोर शिक्षा देता येत नाही. म्हणून, 14 वर्षांच्या मुलाने जरी असा गुन्हा केला तरी त्यालाही कठोर शिक्षा झाली पाहिजे. म्हणूनच मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललो आहे. अल्पवयीन मुलांचं वय 18 वरून 14 वर्ष करण्यासाठी नवीन कायदा करण्याची मागणी केली.
हे ही वाचा >> GBS Disease : राज्यात GBS मुळे पहिला मृत्यू? रुग्णांची संख्याही वाढली, धोका वाढला...
अजित पवार म्हणाले, जेव्हा मी दिल्लीला जाईल तेव्हा पुन्हा अमित शहांशी याबद्दल बोलणार असून, याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करू.