Anjali Damania : "धनंजय मुंडेंचा राजीनामा...", अजित पवार यांच्या भेटीनंतर दमानिया काय म्हणाल्या?

मुंबई तक

अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या कागदपत्रांवर चर्चा करणार आहेत असंही अंजली दमानिया म्हणाल्या. त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवार यांची भेट

point

अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना काय आश्वासन दिलं?

point

भेटीनंतर काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंजली दमानिया यांनी अखेर अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या भेटीत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधातले सर्व पुरावे दिले असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता आधीच अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे.  

अंजली दमानिया म्हणाल्या, आमची 25 ते 30 मिनिट भेट झाली. बीडमधली घटना माणुसकीला धरून नाही, हे त्यांनी मान्य केलं. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्यांच्या पत्नीचे आर्थिक व्यवहार असल्याचे पुरावे मी दाखवले. ते 'ऑफिस ऑफ प्रॉफिट' कसे आहेत, हे गृह मंत्रालयाच्या 102 (a) आणि 129 या कलमानुसार हे दाखवून दिले. असं दमानिया म्हणाल्या.

हे ही वाचा >>Chhaava: 'संभाजी महाराजांपेक्षा काहीही मोठं नाही', राज ठाकरेंची भेट घेतली अन् दिग्दर्शक...

अंजली दमानिया यांनी असंही सांगितलं की, उद्या अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत या कागदपत्रांवर चर्चा करणार आहेत. अशा निर्घृण कृत्यांना थारा देऊ नका अशी मागणी मी त्यांच्याकडे केल्याचं दमानिया यांनी सांगितलं आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं असंही दमानिया म्हणाल्या.

 

हे ही वाचा >>Baba Siddique: 'हत्येच्या दिवशी वडिलांनी डायरीत BJP नेत्याचे नाव लिहिलेलं...', झिशान सिद्दीकींचा पोलिसात जबाब

दरम्यान, फक्त राजीनामा घेऊन भागणार नाही, तर हा गुन्हा आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांची आमदारकी सुद्धा जाऊ शकते असं मला स्पष्ट दिसत असल्याचं दमानिया यांनी सांगितलं आहे. अंजली दमानिया यांनी काल ट्विट करत अजित पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता.
 


अंजली दमानिया काय म्हणाल्या होत्या?

"धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे. अजित पवार आणि माझा ३६ चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन, पण बीड चे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा हैवाण लोकांना थरा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? मग वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत, कसे व्यवहार एकत्र आहेत, धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे Mahagenco शी कसे व्यवहार करत आहेत हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली आहे. हे Office of Profit आहे आणि मंत्रिपद काय आमदारकी रद्द झाली पाहिजे बघू कधी वेळ देता"




हे वाचलं का?

    follow whatsapp