Beed News : बीड पुन्हा हादरलं! पोलीस मुख्यालयातच पोलिसाची आत्महत्या, नेमकं कारण काय?

मुंबई तक

Beed Police : बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्यामुळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जिथं नोकरी करत होते, तिथेच केली आत्महत्या

point

पोलीस मुख्यालयाच्या आवारातच संपवलं जीवन

point

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ठरले होते पात्र

गेल्या काही दिवसांपासून बीडमधून रोज नवनवे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा थेट बीड पोलीस मुख्यालयातूनच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनंत मारुती इंगळे असं या हवालदाराचं नाव असून, ते केज तालुक्यातील कळम आंबा गावचे रहिवासी आहेत. अनंत इंगळे हे कर्तव्यावर असताना त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या आवारातील आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा >> Pune Crime News : कंपनीच्या पार्किंगमध्ये 28 वर्षीय तरूणीची कोयत्याने सपासप वार करत हत्या, कंपनीत सोबतच करत होते काम

बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्यामुळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर कळंब आंबा गावचे सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांचंही अपहरण झालं होतं. 

कर्तव्यावर असतानाच इंगेळ यांनी 7 जानेवारी 2025 रोजी मध्यरात्री  पोलीस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहीत होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. या प्रकरणानंतर आता या प्रकरणावरुन वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत.

हे ही वाचा >> Walmik Karad: 'लाकडं पाठवून द्यावी, तसंही कराड सुटल्यावर...', कराडवरून संजय राऊतांचा करडा सवाल

अनंत इंगळे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुली असून, एका मुलीचं नाव वेदिका इंगळे तिचं वय पाच वर्ष आहे. तसंच त्यांचे भाऊ, वडील आणि आई असा त्यांचा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस खाते अंतर्गत पोलीस पदोन्नतीच्या अनुषंगाने अनंत इंगळे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या घनटेमागे नेमकं कारण काय हे पोलीस तपासातच उघड होणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp