Walmik Karad जेलच्या ज्या बराकमध्ये आहे, तिथले CCTV बंद? दादासाहेब खिंडकर यांचे गंभीर आरोप
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहे. वाल्मिक कराडनेच संतोष देशमुख यांना मारण्याचा कट रचल्याचं सीआयडीच्या चार्जशीटमध्ये केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

"वाल्मिक कराड ज्या बराकमध्ये आहे तिथले सीसीटीव्ही बंद"

बीड तुरूंगात नेमकं काय घडतंय? देशमुख कुटुंबाला संशय

तुरुंग कर्मचारी वाल्मिकला मदत करत असल्याचा आरोप
14 जानेवारीला वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात गेल्यापासून सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलेले आहेत असा आरोप संतोष देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खिंडकर यांनी केला आहे. वाल्मिक कराड हा नऊ नंबरच्या बराकमध्ये आहे. त्याच ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जेल प्रशासनाच्या पत्रामध्ये 9 नंबर बराक चे सीसीटीव्ही नादुरुस्त दाखवला गेला आहे. कर्मचाऱ्यांनी कायदा मोडलेला असेल, म्हणून त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे असंही त्यांनी म्हटलं असून, आरोपीला मदत करणारे कर्मचारी आहेत त्यांना तात्काळ चौकशी करून कारवाई करावी मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार आहेत असं दादासाहेब खिंडकर यांनी सांगितलं.
हे ही वाचा >>Dhananjay Munde : "धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार", फेसबूक पोस्टमुळे चर्चांना उधान
वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहे. वाल्मिक कराडनेच संतोष देशमुख यांना मारण्याचा कट रचल्याचं सीआयडीच्या चार्जशीटमध्ये केला आहे. तर दुसरीकडे आता तुरूंगात असलेल्या वाल्मिकला सर्व सुविधा, जेवण मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबाने केला आहे. त्यामुळे तुरूंग प्रशासनावरही सवाल उपस्थित होत आहेत.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : मातोश्रीवर ठाकरेंच्या खासदारांची बैठक, रणनीती ठरली, एक खासदार गैरहजर...
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काल एक मोठी माहिती समोर आली आहे. सीआयडीने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चार्च शीट दाखल केली असून, वाल्मिक कराड हाच मुख्य सुत्रधार असल्याचा दावा सीआयडीने केला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या असून, तो मंत्री धनंजय मुंडे यांचा नीकटवर्तीय असल्यानं पर्यायाने धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढणार का हे पाहणं महत्वाचं असेल. त्यातच करूणा मुंडे यांनी केलेल्या एका पोस्टमुळे चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार असून, आता पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. करूणा मुंडे यांनी थेट तारीख लिहून "3-3-2025 को राजी नामा होगा" असं म्हटलं आहे. अधिवेशनाच्या आधीच अजित पवार त्यांचा रैाजीनामा घेतील असं त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहे. वाल्मिक कराड सरेंडर झाला होता तेव्हा तोच म्हणाला होता की, जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हावी, त्यामुळे मला वाटतं फाशी झाली पाहिजे असं करूणा मुंडे म्हणाल्या आहेत.