Sambhajinagar Honour Killing : जातीबाहेरच्या मुलाशी प्रेमसंबंध, भावाने बहिणीला थेट दरीत ढकललं, क्रिकेट खेळणाऱ्या पोरांमुळे घटना उघड
या घटनेची माहिती मिळताच वाळूज, वळदगाव आणि तीसगाव परिसरात एकच खळबळ उडाली. शिवारातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जातीबाहेरच्या मुलाशी प्रेम करणाऱ्या तरूणीला भावानेच संपवलं

समजवण्याच्या बहाण्याने डोंगरावर घेऊन जात दरीत लोटलं

क्रिकेट खेळणाऱ्या पोरांनी डोंगरावरचा थरार रेकॉर्ड केला
Chhatrapati Sambhajinagar : जातीबाहेरच्या मुलाशी प्रेम केलं म्हणून, एका 17 वर्षीय तरुणीची 300 फूट दरीत ढकलून हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील तीसगाव शिवारात ही थरारक घटना घडलीय. ऋषिकेश शेरकर असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक करत घटनेचा तपास सुरू केलाय.
आंतरजातीय विवाह न करण्यासाठी भाऊ आपल्या बहीणीला गळ घालत होता. तिला समजावण्यासाठीच आरोपी भाऊ तरुणीला डोंगरावर घेवून गेला. परंतु तिथं वाद विकोपाला गेल्यानंतर ऋषिकेशने आपल्याच बहिणीला 300 फूट दरीत ढकलून दिलं. त्यानंतर जखमी तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणी ही जालन्यातील शहागड गावात राहणारी आहे. बारावीत शिकत असलेल्या तरुणीला जातीबाहेरच्या मुलाशी प्रेम जडलं होतं. हे प्रकरण ज्यावेळी घरच्यांना कळलं तेव्हा खटके उडायला सुरुवात झाली. शेरकर कुटुंबियांनी आधी आपल्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्यास तयार नसल्यानं कुटुंबियांनी तिला संभाजीनगरातील चुलत्याकडे पाठवलं. घरी चुलता, चुलती आणि चुलत भाऊ राहत असल्याने तरुणीला प्रियकराशी संपर्क करता येत नव्हता. तसेच मोबाईल नसल्यानं देखील तरुणी अस्वस्थ होती. म्हणूनच चुलत भाऊ ऋषिकेशने याच विषयावर तिला समजावण्यासाठी डोंगरावर नेलं. दोघे वर चढत असताना खाली क्रिकेट खेळणाऱ्या पोरांनी त्यांना पाहिलेलं होतं.
हे ही वाचा >> Beed News : बीड पुन्हा हादरलं! पोलीस मुख्यालयातच झाडाला गळफास घेऊन पोलीस हवालदाराने स्वत:ला संपवलं, नेमकं कारण काय?
डोंगरावर प्रेमसंबंधांच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाले, त्यातून ऋषिकेशने बहिणीला 300 फूट दरीत ढकलून दिलं आणि धावत डोंगराखाली येवू लागला. याचवेळी ऋषिकेश एकटाच खाली येत असल्यानं क्रिकेट खेळणाऱ्या पोरांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. ऋषिकेशला त्यांनी हटकलं आणि पोलिसांना फोन केला. चौकशी केल्यानंतर भावानेच बहिणीची हत्या केल्याचं उघड झालं.
दगरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वाळूज, वळदगाव आणि तीसगाव परिसरात एकच खळबळ उडाली. शिवारातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
हे ही वाचा >> HMPV Virus Cases : देशभरात वाढले HMPV चे रुग्ण, तब्बल 30 टक्के रुग्ण महाराष्ट्रात, कोणकोणत्या राज्यात रुग्णांना लागण?
17 वर्षीय बहिणीचा जीव घेणारा आरोपी ऋषिकेश हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. वळदगावात राहणारा आरोपी वाळूज एमआयडीसीत काम करून उदरनिर्वाह करत होता. काही लोकांना मारहाण केल्याच्या प्रकरणात आरोपी ऋषिकेशवर यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच एका प्रकरणात त्याला तीन महिने तुरुंगवासही झालेला आहे. बहीणीला डोंगरावरून ढकलून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणामुळे संभाजीनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.