Sambhajinagar : शिवजयंतीमध्ये गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवणारा 21 वर्षीय तरूण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई तक

Sambhajinagar News: छत्रपती शिवरायांच्या विचारांनी शिवजयंती साजरी व्हावी, आनंदोत्सव साजरा करावा असं अभिप्रेत असताना, अशावेळी गुन्हेगारांचे पोस्टर झळकावणं कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होत होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवजयंतीच्या मिरवणुकीत कुख्यात गुंड लॉरेन्सचे फोटो

point

21 वर्षीय तरूण संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवणाऱ्या एका तरुणाला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी काल ताब्यात घेतलंय. दर्शन उर्फ ​​विशाल श्याम पवार (साळुंके) असं या तरुणाचं नाव आहे. 21 वर्षांचा हा तरूण शहरातील जय भवानी नगर परिसरात राहतो. सध्या त्याला छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

19 फेब्रुवारीला राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या पद्धतीनं जल्लोष करण्यात आला. मात्र, हा सर्व आनंदोत्सव सुरू असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रॅलीमध्ये शिवरायांचे पोस्टर, त्यांचे विचार लिहिलेले पोस्टर दिसण्याऐवजी या रॅलीमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो दिसले होते. 

हे ही वाचा >>Vijay Wadettiwar Tweet : "शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे...", विजय वडेट्टीवारांचा घणाघात

छत्रपती संभाजीनगरमध्ये मिरवणुकीदरम्यान लॉरेन्सचे पोस्टर हाती घेतलेल्या तरूणाचे व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस सक्रीय झाले होते. त्यानंतर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या तरूणाला शोधून काढलं आणि ताब्यात घेतलं. 

अहिल्यानगरमध्येही सारखाच प्रकार

हे ही वाचा >> Pratap Sarnaik : "तुळजापूर, धाराशिवमधून ड्रग्ज तस्करांचा नायनाट करा, नाहीतर...", सरनाईकांनी पोलिसांनाही दिला इशारा

अहिल्यानंतरमध्ये निघालेल्या रॅलीमध्ये तुरूंगात असलेले गुंड लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर घेऊन काही तरूण नाचत असल्याचं दिसलं. तसंच योगी आदित्य नाथ, नितेश राणे आणि अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांचेही पोस्टर या तरूणांच्या हातात दिसले. विशेष म्हणजे ही रॅली कोतवाली पोलीस स्टेशनजवळ आणि मशिदीसमोर येताच तरुणांनी हे सर्व पोस्टर्स हातात घेतलेले दिसले. तसंच नितेश राणे यांच्या पोस्टरवर वादग्रस्त वाक्यही लिहिण्यात आलेले होते. त्यामुळे अहिल्यागर पोलीस काय कारवाई करणार यावर आता सर्वांचं लक्ष आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp