Pimpri Chinchwad : ग्राहकानं 595 देऊन पिझ्झा ऑर्डर केला, घास घेताच तोंडात चाकूचा तुकडा घुसला, पिंपरी चिंचवडमधील प्रकार काय?

मुंबई तक

पिझ्झामध्ये धारदार कटर सापडल्याचं अरूण कापसे यांनी स्वत: माध्यमांसमोर आणलं आहे. पिझ्झा खाताना त्यांच्या तोंडात कटरचा तुकडा घुसला. हा फोटो पाठवल्यावर मॅनेजर घरी पोहोचला आणि फोटो व्हायरल करू नका अशी विनंती करू लागला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा सापडला

point

पिझ्झा खाताना तुकडा ग्राहकाच्या तोंडाला लागला

point

घटना कळताच मॅनेजर माफी मागायला घरी आला

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा सापडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अरुण कापसे नावाच्या व्यक्तिने पिझ्झा मागवला होता. यासाठी त्यांनी 596 रुपये ऑनलाइन भरले. पण, जेव्हा पिझ्झा आला आणि तो खायला सुरुवात केली, तेव्हा त्यातून चाकूचा (कटर) एक तुकडा बाहेर आला. पिझ्झा खाताना चाकू लागल्यानं किरकोळ दुखापत झाल्यानं ही बाब त्यांनी पिझ्झा कंपनीच्या व्यवस्थापकाला सांगितली. चाकू सापडल्याचा फोटो पाठवल्यानंतर व्यवस्थापकाने तक्रारदार अरुण कापसे यांचं घर गाठून तो फोटो सोशल मीडियावर शेअर करू नये, अशी विनंती करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा >> राजन साळवींचा उद्धव ठाकरेंकडून पाणउतारा, 'मातोश्री'मधील प्रचंड खळबळजनक Inside स्टोरी

पिझ्झामध्ये धारदार कटर सापडल्याचं अरूण कापसे यांनी स्वत: माध्यमांसमोर आणलं आहे. पिझ्झा खाताना त्यांच्या तोंडात कटरचा तुकडा घुसला. हा फोटो पाठवल्यावर मॅनेजर घरी पोहोचला आणि फोटो व्हायरल करू नका अशी विनंती करू लागला. एकूणय या प्रकारामुळे नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. 

हे ही वाचा >> 'संतोष देशमुखांचा खून आरोपींनी एन्जॉय केला', सुदर्शन घुले कोर्टात.. नेमकं काय घडलं?

तक्रारदार अरुण कापसे म्हणाले, 'मी शुक्रवारी एका नामांकित कंपनीकडून पिझ्झा मागवला. मी पिझ्झासाठी 596 रुपयेही दिले. पण पिझ्झा खाताना अचानक मला चाकूचा तुकडा जाणवला. चेक केल्यावर कळलं की, तो चाकूचा तुकडा आहे. तो कटरसारखा दिसत होता. यानंतर मी त्याचा फोटो काढून पाठवला. काही वेळात कंपनीचे व्यवस्थापक आले. हे प्रकरण मीडियापर्यंत जाऊ नये म्हणून त्यांनी पिझ्झासाठी पैसे न देण्यास सांगितलं. मात्र, आपण अन्न व औषध प्रशासनाकडेही तक्रार करणार असल्चाचं फिर्यादींनी म्हटलं आहे.

एकूण, कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कापसे यांच्या तोंडाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र, हे संकट थोडक्यात टळलं. त्यामुळे ते आता या प्रकरणाता पाठपुरावा करून कंपनीवर कारवाईची मागणी करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp