Devendra Fadnavis : "शरद पवार चाणक्य, म्हणून...", पवारांनी RSS चं कौतुक केल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?

योगेश पांडे

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही 2019 नंतर माझी विधानं तुम्ही ऐकली असतील.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवार यांच्याकडून RSS चं कौतुक

point

पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले फडणवीस?

point

अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याबद्दल काय म्हणाले फडणवीस?

विधानसभेत भाजपच्या विजयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे असं शरद पवार म्हणाले होते. आता शरद पवार यांच्या याच विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, 'शरद पवार हे चाणक्य आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने पसरवलेला खोटा नरेटीव्ह विधानसभा निवडणुकीत कसा फसला हे त्यांना नक्कीच कळलं असेल. शरद पवारांना हे लक्षात आलं असेल की, ही शक्ती (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) राजकारण करणारी नाही, तर ती राष्ट्र घडवणारी शक्ती आहे. त्यामुळे शेवटी, एखाद्याला आपल्या प्रतिस्पर्ध्याचंही कौतुक करावं लागतं. म्हणूनच त्यांनी संघाचं कौतुक केलं असावं असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही 2019 नंतर माझी विधानं तुम्ही ऐकली असतील. 2019 ते 2024 पर्यंत घडलेल्या घटनांमुळे मला समजलं की काहीही अशक्य नाही. एखादी गोष्ट अशक्य आहे असा विचारच करू नये. कारण काहीही होऊ शकतं. उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत जातात, अजित पवार आमच्यासोबत येतात. त्यामुळे राजकारणात काहीही घडू शकतं. 

हे ही वाचा >>Sharad Pawar on RSS : शरद पवार यांनी खरंच RSS चं कौतुक केलं? का होतेय चर्चा?

ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेते विलास फडणवीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस नागपूरला आले होते. कार्यक्रमात भाषण करताना ते म्हणाले, 'राज्याच्या निवडणुकीत अराजकतावादी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रीय शक्तींना एकत्र आणण्यात आरएसएसने महत्त्वाची भूमिका बजावली. विधानसभा निवडणुकीत आम्ही आरएसएसला विनंती केली होती की, राष्ट्रीय शक्तींनी अराजकतावादी शक्तींविरुद्ध एकत्र येण्याची गरज आहे. आरएसएस विचारसरणी कुटुंबातील विविध संघटनांच्या लोकांनी आपापल्या क्षेत्रात अराजकाविरुद्ध लढण्यासाठी भूमिका बजावल्या.

हे ही वाचा >>Santosh Deshmukh Case : "तपासाबद्दल काहीच माहिती नाही...", संतोष देशमुखांच्या लेकीचा यंत्रणांना सवाल 

देवेंद्र फडणवीस पुढे लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत असंही म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी फेक नरेटीव्ह बनवण्यात यशस्वी झाली. यामुळे त्यांना असा अतिआत्मविश्वास निर्माण झाला की, ते असा फेक नरेटीव्ह तयार करून सत्तेत येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीदरम्यान माझ्यासह आम्हाला सर्वांनाच आत्मविश्वासू होतो. आम्हाला माहिती होतं की आम्ही जिंकत आहोत. म्हणूनच, संविधान बदलण्याबद्दल विरोधकांच्या नरेटीव्हचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही हे आम्हाला माहिती होतं असं फडणवीस म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp