Dhananjay Deshmukh : गृहमंत्रालयाला सगळे फोटो, सगळी घटना माहिती होती, एवढे दिवस का थांबले?

मुंबई तक

Marathi News: राक्षसी कृत्याचे फोटो पाहून, काल संध्याकाळी अक्षरश: महाराष्ट्र हादरला. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्या घटनेची संपूर्ण दृष्य सध्या समोर आलेले आहेत. त्यानंतर धनंजय देशमुख आक्रमक झालेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"गृहमंत्रालयाने सगळे फोटो आधीच पाहिले होते"

point

तुम्ही लोक एवढे दिवस का थांबले? देशमुखांचा सवाल

point

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले देशमुख?

Dhananjay Deshmukh News:गृहमंत्रालयाला ही सगळी घटना माहिती होती, सगळे फोटो माहिती होते, एवढे दिवस कसे थांबले? माणसं आहे की कोण आहे? असं म्हणत धनंजय देशमुख यांनी गृहविभागावर सवाल उपस्थित केला. "सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, आरोपी कोण आहे, यांना कोण सांभाळत होतं, यांनी सगळं आयुष्यच सगळे डील करत काढलं.  या संपूर्ण प्रकरणात 150 लोक आहेत. गृहमंत्रालयाच्या नाकावर टीच्चून आरोपी क्रमांक एक हजर झाला" अशा संतप्त भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या. नीच लोकांनी याचं समर्थन केलं, मोर्चे काढले, आंदोलन केले. यांना कधीच वाटलं नाही असं धनंजय देशमुख म्हणाले.

हे ही वाचा >> Manoj Jarange मस्साजोगमध्ये जाताच, धनंजय देशमुख धाय मोकलून रडले, जरांगे म्हणाले बदला होणार!

सगळं मंत्रिमंडळ बरखास्त केलं, तरी माझ्या भावांना मारणाऱ्यांना मारलं तरच आम्ही त्यांच्याबद्दल बोलू, अन्यथा बोलणार नाही. आज आम्ही मरणाच्या दारात आल्यावर तुम्ही राजीनामा घेता का? असा सवाल संतोष देशमुख यांनी केला. मोठी मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करावा आणि आम्हाला सांगावं. आमच्या नाकावर टीच्चून सांगा, की आमच्या गावातला एकही माणूस सोडणार नाही असा संताप धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला.

संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना सीआयडीच्या हाती एक महत्त्वाचा व्हिडिओ सापडला आहे. या व्हिडिओमध्ये सहा आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. सहाही आरोपी अत्यंत क्रुरपणे संतोष देशमुख यांची कपडे काढून त्यांना मारहाण अमानुष मारहाण करत होते.सर्वात मोठी विकृती म्हणजे ही मारहाण सुरु असताना इतर आरोपी मोठमोठ्याने हसत त्यांच्या मारहाणीचा आनंद साजरा करत होते, असं या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी एक व्हिडिओ कॉलही सुरु होता, जो जयराम चाटे याने एका वॉट्सअप ग्रुपवर केला होता. हा सर्वात मोठा डिजीटल पुरावा सीआयडीने सादर केला आहे. 

हे ही वाचा >>"महाराष्ट्रात गुंडांचं राजकारण, त्या आरोपीला...", कैलास बोराडे मारहाण प्रकरणावरून अंजली दमानीया संतापल्या!

संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर मारहाण करताना कृष्णा आंधळेनं एका व्हाट्सअप ग्रुपवर कॉल केला होता. 
मोकारपंती असं या व्हाट्सअप ग्रुपचं नाव होतं. ज्यामध्ये पाच ते सहा जण संतोष देशमुख यांना कसं मारहाण करत होते, हे पाहिलं जात होतं. फॉरेन्सिक कडून हा व्हिडिओ सीआयडीला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे दहा ते बारा व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच या व्हिडिओमधील व्यक्ती आणि सीआयडीने या प्रकरणात ताब्यात घेतलेली व्यक्तींची फॉरेन्सिक तपासणी झाली. या व्हिडिओतील काही फोटो हे या आरोप पत्रात जोडण्यात आले आहेत. ज्यामध्ये सुदर्शन घुले कशाप्रकारे संतोष देशमुखांना मारहाण करतोय हे समोर आलंय. 


हे वाचलं का?

    follow whatsapp